उद्योगांना संजीवनी देणाऱ्या योजनांबाबत जळगावात मार्गदर्शन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:22 AM2018-09-13T00:22:18+5:302018-09-13T00:22:46+5:30

२०० उद्योजकांची उपस्थिती

Jalgaon Guidance Workshop on | उद्योगांना संजीवनी देणाऱ्या योजनांबाबत जळगावात मार्गदर्शन कार्यशाळा

उद्योगांना संजीवनी देणाऱ्या योजनांबाबत जळगावात मार्गदर्शन कार्यशाळा

googlenewsNext

जळगाव : शासनाकडून उद्योगांना अनुदान स्वरूपात मिळणाºया मदतीच्या योजनांची माहितीच उद्योजकांना नसते. त्यामुळे अशा योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच शासनाच्या सामूहिक प्रोत्साहन योजनेसंदर्भात लघुउद्योग भारतीने डीएलएफसीच्या माध्यमातून मंगळवार ११ रोजी एमआयडीसीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यास २०० उद्योजकांची उपस्थिती होती.
यावेळी योजनांची सविस्तर माहिती असलेल्या वेबसाईटचा शुभारंभ जिल्हा उद्योग केंद्राचे सुनील पाटील, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, लघु उद्योग भारतीचे व्हाईस प्रेसिडेन्ट रविंद्र फालक, उद्योजक रविंद्र लढ्ढा, सीए रविंद्र छाजेड, डीएलएफसीचे तज्ज्ञ सी.ए. विरेंद्र छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला.
विरेंद्र छाजेड, सुनील पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक लघुउद्योग भारतीचे देवेंद्र अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन समीक्षा चोपडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डीएलएफसीचे नरेश अहिरे, मुकेश कुलकर्णी, सीए ममता राजानी, सीए नचिकेत जाखेटे, अमित श्रीश्रीमाळ, पियुष बेदमुथा, समीर साने व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
नामांकनाची ३० सप्टेंबर शेवटची मुदत
या कार्यशाळेत शासनाच्या अनेक परिपत्रकांची, योजनांची विस्तृत स्वरूपात माहिती देण्यात आली. तसेच शासनाने २०१३ मध्ये जी सामुहिक प्रोत्साहन योजना सुरू केली होती त्या योजनेची नामांकने करण्याची शेवटची मुदत ३० सप्टेंबर २०१८ आहे. उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: Jalgaon Guidance Workshop on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव