जळगावात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह, अवचित हनुमान मंदिर येथे ७०० किलोचा प्रसाद वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:52 PM2018-03-31T12:52:12+5:302018-03-31T12:52:12+5:30

हनुमानाच्या नामाने दुमदुमले शहर

Jalgaon Hanuman Janmotsav | जळगावात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह, अवचित हनुमान मंदिर येथे ७०० किलोचा प्रसाद वाटप

जळगावात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह, अवचित हनुमान मंदिर येथे ७०० किलोचा प्रसाद वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देविविध मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, सुंदरकांड पठणधार्मिक कार्यक्रम

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३१ - शहरात शनिवारी विविध मंदिरांमध्ये हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषपूर्ण व चैतन्यमय वातावरण साजरा झाला. हनुमान नामाच्या जयघोषाने परिसर निनादला होता. दिवसभर भजन-कीर्तन, सुंदरकांड पठण, भंडारा अशा कार्यक्रमांची रेलचेल होती.
अवचित हनुमान मंदिर येथे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळाच्यावतीने ५०० किलो पोहे व २०० किलो जिलेबीचा प्रसाद वाटप करण्यात आला. या वेळी अध्यक्ष अजय गांधी, रिकेश गांधी व पदाधिकारी उपस्थित होते. १० ते १२ भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
धार्मिक कार्यक्रम
हनुमान जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख हनुमान मंदिरांमध्ये पहाटे ५ वाजता अभिषेक, सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव, संगीतमय सुंदरकांड पठण, भंडारा व महाप्रसाद वाटप, महाआरती, कीर्तन असे कार्यक्रम पार पडले. धार्मिक कार्यक्रमांमुळे चैतन्याचे वातावरण होते. शुक्रवारी रात्रीपासूनच धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला.
मंदिरे सजली
प्रत्येक मंदिरावर आकर्षण विद्युत रोशणाई करण्यात आलेली होती. मंदिर परिसरात मनोवेधक रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. भजन, गीतांचे मंगलमय ध्वनी वातावरणात प्रसन्नता वाढवत होते. ठिकठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला.
दर्शनासाठी रांगा...
जिल्हा परिषदेजवळील पत्र्या हनुमान मंदिर, गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदिर, शाहूनगरातील तपस्वी हनुमान मंदिर, सिंधी कॉलनी रस्त्यावरील पंचमुखी हनुमान मंदिर, शिवाजीनगरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

Web Title: Jalgaon Hanuman Janmotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव