जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८३ टक्क्यांवर, राज्यात दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:17 AM2021-05-27T04:17:56+5:302021-05-27T04:17:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : १८ ते २४ मे या आठ‌वड्यात कोरोनाचे दोन हजार ५३ नवे रुग्ण आढळून आले ...

Jalgaon has a positivity rate of 3.83 per cent, second only to the state | जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८३ टक्क्यांवर, राज्यात दुसऱ्या स्थानी

जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८३ टक्क्यांवर, राज्यात दुसऱ्या स्थानी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : १८ ते २४ मे या आठ‌वड्यात कोरोनाचे दोन हजार ५३ नवे रुग्ण आढळून आले तर ५३ हजार ६५१ चाचण्या करण्यात आल्या. या आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८३ टक्के एवढा आहे. हा दर राज्यात दुसऱ्या स्थानी असल्याने जळगाव जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. यात पहिल्या स्थानावर भंडारा जिल्हा ३.४३ टक्क्यांसह आहे.

जळगाव जिल्ह्यात एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. रुग्णसंख्या सातत्याने वाढत होती. रुग्णालयांमध्ये जागादेखील मिळत नव्हती. मात्र मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. आता हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात दररोज १ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. मात्र नंतरच्या काळात ही संख्या कमी होऊ लागली. आता दररोजचे रुग्ण हे ३०० ते ४०० च्या आसपास येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांमधील बेडदेखील रिकामे होऊ लागले आहेत. काही कोविड सेंटर रिकामे झाले तर काहींनी आपले कोविड सेंटर बंद करून टाकले आहे.

प्रशासनाच्या आकडेवारीत मोठा फरक

जळगाव जिल्हा प्रशासनाने ट्विटरवर बुधवारी दुपारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३.८३ टक्के एवढा आहे. राज्यात फक्त भंडारा जिल्हाच जळगावच्या पुढे आहे. मात्र ही आकडेवारी किती खरी मानावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाच्या ॲपवरून एकत्रित केलेली माहिती जिल्हा प्रशासनाने ट्विट करून प्रसिद्ध केली आणि स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी दररोज प्रसिद्ध केलेली आकडेवारी आणि बुधवारी ट्विटरवर प्रसिद्ध केलेली आकडेवारी ही जुळत नाही. यात शासनाच्या पोर्टलवर अपडेट न झाल्याने आकडेवारीत मोठा फरक दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यातून जिल्हा प्रशासन कोरोनाचे आकडे लपवत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट - राज्य शासनाच्या ॲपवरील डेटा आणि जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेली माहिती यात फरक असू शकतो. दररोज जी माहिती आम्ही प्रसिद्ध करतो ती आम्हाला मेलवर आलेली असते. तर आठवडाभराची एकत्रित माहिती ही शासनाच्या ॲपवरून आलेली असते. ती काही वेळा अपडेट झालेली नसते. मात्र ही माहितीदेखील पुढील एक-दोन दिवसांत अपडेट केली जाते

- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.

तारीख, बुधवारी जाहीर केलेले कोरोना रुग्ण, दररोजचे कोरोना रुग्ण (अनुक्रमे)

१८ मे ४०१ - ५२१

१९ मे ३९१ - ४९४

२० मे ४३१ - ३५७

२१ मे ४२२ - ४१०

२२ मे १५८ - ४०५

२३ मे ८६ - ३६२

२४ मे १६४ - ३१२

Web Title: Jalgaon has a positivity rate of 3.83 per cent, second only to the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.