जळगावात माणुसकीचे दर्शन, मरणासन्न अवस्थेतील बेवारस तरुणास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:14 PM2017-11-30T12:14:34+5:302017-11-30T12:17:04+5:30
आठ दिवसांपासून पडलेल्यास गोलाणी मार्केटमधील व्यावस्यायिकांनी दिला आधार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 30 - सहा महिन्यांपासून भटकत फिरणा:या व गेल्या आठ दिवसांपासून गोलाणी मार्केटमध्ये मरणासन्न अवस्थेतील बेवारस मतीमंद मुलाला येथील व्यावसायिकांनी पुढाकार घेत जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याला जीवदान दिले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला महानगरप्रमुख मंगला बारी यांच्यासह व्यावसायिकांनी पदरमोड करीत त्याला नवीन कपडे घेऊन देत त्याची स्वच्छ आंघोळ करून घेत त्याला मदत केली.
साधारण 25 वर्षे वयोगटातील एक मतीमंद तरुण गेल्या सहा महिन्यांपासून शहर व परिसरात फिरत होता. गेल्या आठ दिवसांपासून हा तरुण गोलाणी मार्केटमध्ये पडलेला होता. तेथे तो काहीही खात नव्हता. केवळ पाणी पित होता. या दरम्यान आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीनेदेखील त्याची अत्यंत वाईट स्थिती झाली होती. पोटाला अन्न नसल्याने हा तरुण अत्यंत हाडकुळा झाला असून त्याच्या सर्व बरगडय़ा व हाडे दिसून येत आहे. एकाच ठिकाणी पडून होता. अगदी नैसर्गिकविधी देखील तेथेच करीत होता. त्यामुळे तो अत्यंत घाणीने माखला गेला व त्याची दरुगधीही सुटली होती.
या बाबत मंगळवारी शिवसेनेच्या महिला महानगरप्रमुख मंगला बारी यांना माहिती मिळाल्याने त्यांनी 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधून बोलविले. तेथे रुग्णवाहिका आली मात्र तरुण घाणीने माखलेला असल्याने त्याला उचलणेही कठीण होते. त्यामुळे ते परत गेले. अखेर बुधवारी मंगला बारी यांनी तसेच इतर व्यावसायिकांनी मिळून खर्च करीत काही जणांना बोलावून या तरुणाची आंघोळ, दाढी करवून घेतली तसेच त्यास नवीन कपडे आणून दिले. त्याची स्वच्छता करण्यात आल्यानंतर त्यास 108 रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातही तातडीची मदत
जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर या तरुणावर वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार तसेच परिचारिका व कर्मचा:यांनी तातडीने उपचार केले. या तरुणाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून अशक्तपणादेखील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या या तरुणावर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू असून येथे त्याची देखभाल केली जात आहे.
मानसिक धक्का बसल्याचा अंदाज
कधी पासून इकडे तिकडे फिरणा:या या तरुणास मानसिक धक्का बसला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तो स्वत:चे नावदेखील सांगत नाही. केवळ भुसावळ असा उल्लेख तो करतो. त्यामुळे तो नेमका कुठला आहे, हे देखील समजू शकलेले नाही.
व्यावसायिकांच्या माणुसकिचे कौतुक
कोणतीही ओळख अथवा काहीही माहिती नसताना मंगला बारी यांनी पुढाकार घेत गोलाणी मार्केटमधील व्यावसायिकांच्या मदतीने एका बेवारस तरुणासाठी 700 ते 800 रुपयांचा खर्च करीत त्याच्या उपचारासाठी पुढाकार घेत माणुसकीचे दर्शन घडविले:या या मदतकार्याचे सर्वाकडून कौतुक केले जात आहे.