Jalgaon: महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे अशोक जैन यांचा सन्मान  

By अमित महाबळ | Published: April 7, 2023 05:48 PM2023-04-07T17:48:58+5:302023-04-07T17:49:17+5:30

Jalgaon: महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Jalgaon: Honoring Ashok Jain by Maharashtra Chess Inspiration Day Committee | Jalgaon: महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे अशोक जैन यांचा सन्मान  

Jalgaon: महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे अशोक जैन यांचा सन्मान  

googlenewsNext

- अमित महाबळ
जळगाव  - महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या एकत्रितरित्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावची साक्षी शुक्ला हिने ग्रॅंड मास्टर अभिजित कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली.

जैन हिल्सच्या सुधीर बोस सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी ध्यानचंद पुरस्कारार्थी व भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीचे मकरंद वेलणकर, संजय आढाव, राघव पठाडे, सुधीर भालेराव उपस्थित होते. ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’ या पुरस्काराने अशोक जैन यांचा गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आज महाराष्ट्रात ११ पुरुष व ५ महिला ग्रॅंड मास्टर असून, अनेक आंतरराष्ट्रीय पंच झाले आहेत. त्याचे श्रेय अशोक जैन यांनी केलेल्या पायाभूत कार्यात असल्याचे अभिजीत कुंटे यांनी सांगितले.

इंदोर येथील अखिल भारतीय स्तरावरील २००० आतील रेटिंग असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचे सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी यांनी यश प्राप्त केले. त्यांचा अशोक जैन, अतुल जैन, अभिजीत कुंटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख, सहसचिव शकिल देशपांडे, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य तेजस तायडे, चंद्रशेखर देशमुख, प्रवीण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी, संजय पाटील, प्रा. व्ही. डी. पाटील यांनी अशोक जैन यांचा सत्कार केला. नथ्यू सोमवंशी, सोमदत्त तिवारी, आकाश धनगर, संजय काटोले, अजित घारगे, जयेश बाविस्कर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

या सामन्यामुळे वेधले लक्ष...
ग्रँड मास्टर अभिजित कुंटे हे नीलेप पाटील, सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी, जयेश सपकाळे, दुर्वेश कोळी, साक्षी शुक्ला, आम्रपाली खरचाणे, आदिती अलाहीत, आरूष सरोदे, मुस्कान जैन, निधी जैन, धीरज मगरे, प्रकाश पाटील, जयेश निंबाळकर या खेळाडूंसोबत एकत्रितरित्या (सायमन्स टेनिस) एकाच वेळी बुद्धिबळ खेळले. या स्पर्धेत साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजित कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली.

Web Title: Jalgaon: Honoring Ashok Jain by Maharashtra Chess Inspiration Day Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.