जळगावात अवैध धंदे आढळल्यास प्रभारी अधिकाऱ्यांनाच ‘कोर्स’ची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:07 PM2018-12-16T17:07:55+5:302018-12-16T17:10:53+5:30
जिल्ह्यात अवैध धंदे बंद असलेच पाहिजेत. आता कुठे अवैध धंदे आढळून आले किंवा कोणी कर्मचारी हप्ते वसुल करीत असेल तर त्या कर्मचाºयासह प्रभारी अधिकाºयालाच नवचैतन्य कोर्सला आणले जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी गुन्हे आढावा बैठकीत दिला.
जळगाव : जिल्ह्यात अवैध धंदे बंद असलेच पाहिजेत. आता कुठे अवैध धंदे आढळून आले किंवा कोणी कर्मचारी हप्ते वसुल करीत असेल तर त्या कर्मचाºयासह प्रभारी अधिकाºयालाच नवचैतन्य कोर्सला आणले जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी गुन्हे आढावा बैठकीत दिला.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात सकाळी ९.३० वाजता सुरु झालेली ही बैठक सायंकाळी सहा वाजता संपली. प्रथमच साडेआठ तास मॅरेथॉन बैठक चालली. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक व प्रभारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिंदे यांनी अधिकाºयांना चांगलाच घाम फोडला.
बैठकीच्या प्रारंभी पोलीस अधीक्षक शिंदे यांनी पोलीस स्टेशननिहाय गुन्ह्यांचा आढावा घेतला. प्रलंबित असलेले गुन्हे निकाली काढण्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ८० कर्मचाºयांना नवचैतन्य कोर्ससाठी मुख्यालयात जमा केले असले तरी अजूनही काही प्रमाणात धंदे सुरु असल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे प्रभारी अधिकाºयांनी त्याची खबरदारी घ्यावी, अन्यथा प्रभारी अधिकाºयांनाही नवचैतन्य कोर्ससाठी आणून दुय्यम अधिकाºयांना त्यांच्या जागी संधी दिली जाईल.
कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी प्रामाणिकपणे आपले काम करावे हीच अपेक्षा आहे. आता प्रभारी अधिकाºयांनाच नियंत्रण कक्षात आणण्यासह नवचैतन्य कोर्सही सक्तीचा केला जाईल. गुन्हे आढावा बैठकीतही अधिकाºयांना तंबी दिली आहे. -दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक