जळगावात भाजप मंडल अध्यक्ष निवड तर झाली, महानराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:25 PM2019-12-29T12:25:09+5:302019-12-29T12:26:08+5:30

विद्यमान अध्यक्षांसह चंदूलाल पटेल, अस्मिता पाटील, ललित कोल्हे यांच्या नावाची चर्चा

In Jalgaon, if the president of the BJP board is elected, who will be the president of the post of general president? | जळगावात भाजप मंडल अध्यक्ष निवड तर झाली, महानराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार......

जळगावात भाजप मंडल अध्यक्ष निवड तर झाली, महानराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार......

Next

जळगाव : भाजपच्या संघटनात्मक निवडणुकी अंतर्गत जळगाव महानगरातील सर्व नऊ मंडल अध्यक्षांची निवड झाली आहे. आता महानगराध्यक्ष निवडीकडे लक्ष लागलेले आहे. या पदासाठी ग्रामीण जिल्हाध्यक्षांप्रमाणे अनेकांची नावे चर्चेत असून अनेकांनी इच्छादेखील बोलून दाखविली आहे. या चर्चेतील नावामध्ये विद्यमान महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, माजी जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे यांचा समावेश असून तेदेखील इच्छुक आहेत.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम लांबतच गेला असून बुथ अध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या निवड रखडल्याने जिल्हाध्यक्षांचीही निवडणूक लांबणीवर पडली. महानगराध्यक्ष निवडही होणे अद्याप बाकी असून तत्पूर्वी होणाऱ्या मंडल अध्यक्षांची निवड आता पूर्ण झाली आहे. सर्व नऊ मंडलाध्यक्षांची निवड झाली असून त्यात शिवाजीनगर मंडल क्रमांक - १च्या अध्यक्षपदी रमेश जोगी, महर्षी वाल्मीक मंडल क्रमांक २च्या अध्यक्षपदी परेश जगताप, आयोध्यानगर परिसर मंडल क्रमांक ३ - प्रवीण कोल्हे, रिंगरोड परिसर मंडल क्रमांक ४ - केदार देशपांडे, पिंप्राळा परिसर मंडल क्रमांक ५ - शक्ती महाजन, रामानंद नगर परिसर मंडल क्रमांक ६ - अजित राणे, झुलेलाल मंडल क्रमांक ७ - संजय लुल्हा, मेहरुण परिसर मंडल क्रमांक ८ - विनोद मराठे, महाबळ परिसर मंडल क्रमांक ९ - नीलेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय संघटनमंत्री घेणार निर्णय
मंडल निवड पूर्ण झाली असून हा अहवाल महानगराध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी विजय साने यांच्याकडे पाठविण्यात येणार असून ते भाजपचे विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्याशी चर्चा करून महानगराध्यक्ष निवडीची तारीख निश्चित करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मंडल अध्यक्षांची बैठक
महानगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर नूतन मंडल अध्यक्षांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी यांच्यासह माजी अध्यक्ष उपस्थित होते.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडीची शक्यता
जि.प. अध्यक्ष व महापौर निवड ३ जानेवारी पर्यंत होण्याची शक्यता असून त्यानंतर लगेच म्हणजे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात भाजप महानगराध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.
इच्छुकांची भाऊगर्दी
महानगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असून त्यांच्याकडून तयारीदेखील सुरू झाली आहे. महानगराध्यक्षपदासाठी विद्यमान महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, माजी जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे यांची नावे चर्चिले जात आहेत. इतकेच नव्हे तर यातील बहुतांश जणांनी भाजपच्या विभागीय बैठकीत तसेच विभागीय संघटन मंत्र्यांकडेही महानगराध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली.
ही निवड करताना संघटनात्मक काम करणाºया चेहºयाला पसंती असण्यासह सामाजिक समीकरणे जुळविणे, मंडल निहाय संतुलन राखण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खडसे-महाजन गटाचा समन्वय याविषयीदेखील विचार होणार आहे.
संघटनात्मक पदामध्ये ३३ टक्के आरक्षण असल्याने यात महिलांना प्राधान्य देण्याची मागणीदेखील पुढे येत आहे.

Web Title: In Jalgaon, if the president of the BJP board is elected, who will be the president of the post of general president?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव