Jalgaon: जळगावात हिवाळ्यात ही वीजेचा लपंडाव, रात्री-अपरात्री लाईट गुल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 09:53 PM2024-01-14T21:53:36+5:302024-01-14T21:54:23+5:30

Jalgaon: ​​​​​​​जळगाव शहरातील अनेक भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे दिवसा, रात्री-अपरात्री केव्हाही लाईट ये-जा करत असल्याने नागरिकांच्या डोक्याला वैताग आला आहे.

Jalgaon: In winter in Jalgaon, this is a power outage, night and night light gul | Jalgaon: जळगावात हिवाळ्यात ही वीजेचा लपंडाव, रात्री-अपरात्री लाईट गुल

Jalgaon: जळगावात हिवाळ्यात ही वीजेचा लपंडाव, रात्री-अपरात्री लाईट गुल

- भूषण श्रीखंडे 
जळगाव - शहरातील अनेक भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे दिवसा, रात्री-अपरात्री केव्हाही लाईट ये-जा करत असल्याने नागरिकांच्या डोक्याला वैताग आला आहे. त्यात अनेक भागात ज्या वेळी नळाला पाणी येते त्यावेळी लाईट ये-जा करत असल्याने पाणी भरता येत नसल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

थंडीच्या दिवसात जळगावातील काही भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाळ्यात ज्या पद्धतीने विजेचा लंपडाव होत आहे. दिवसा, रात्री-अपरात्री केव्हाही लाईट जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे वीज ये-जा करत असल्याने महिला वर्गाला याचा जास्त त्रास होत आहे. त्यात ऐन सायंकाळी अंधार पडल्यावर लाईट जास्त वेळा जात असल्याने महिलांची धावपळ होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यास दोन-तीन महिने अजून बाकी असूनदेखील आतापासून विजेचा लंपडाव जळगावकरांना अनुभवयास मिळत आहे.

महावितरणकडून सुरू होती दुरुस्ती
महावितरणकडून काही सबस्टेशन अंतर्गत दुरुस्तीचे कामे गेल्या तीन-चार दिवसांपासून हाती घेतले आहे. यात डीपीवरील दुरुस्ती, वीजवाहिन्यांना जॉईंट मारणे, सर्व्हिस वायर बदलविणे आदी विद्युत लाइनवरील कामे महावितरणे घेतले होते.

या भागात विजेचा लंपडाव सुरू
किसनराव नगर सबस्टेशन, हुडको सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात विजेचा लपंडावचा खेळ काही दिवसांपासून जास्त प्रमाणात दिसत आहे. त्यात शहरातील अन्य भागात देखील वीज ये-जा करण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली आहे.

Web Title: Jalgaon: In winter in Jalgaon, this is a power outage, night and night light gul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.