जळगावात चिमुकल्यांच्या सुप्त गुणांचा आविष्कार, विविध खेळ, मनोरंजनासह शैक्षणिक मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:15 PM2018-01-06T12:15:30+5:302018-01-06T12:18:22+5:30
अनुभूती स्कूलतर्फे ‘एडय़ुफेअर’चे आयोजन
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 06- बुद्धिमत्तेला चालना देणारे रंजक खेळ, मनोरंजन, जादूचे प्रयोग, फुलांची दुनिया, स्नोवल्र्ड, सीवल्र्ड, फॅन्सी लॅण्ड, हस्तकला, भूलभुलैय्या अशा चिमुकल्यांच्या सुप्त गुणांमधून साकारलेल्या शैक्षणिक व बुद्धिमत्तेला चालना देणा:या अनोख्या प्रकल्पांचा अविष्कार शिवतीर्थ मैदानावर साकारला असून त्यास पहिल्या दिवसापासूनच शहरवायीयांकडून दाद मिळत आहे.
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल-2च्या विद्याथ्र्याचा ‘एडय़ुफेअर 2018’चे 5 ते 7 जानेवारीदरम्यान दुपारी 3 ते रात्री 9 वाजेदरम्यान शिवतीर्थ मैदानावर आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, तनय मल्हारा, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी, अभेद्य जैन यांच्याहस्ते कागदी रंग-बिरंगी विमान हवेत सोडून उद्घाटन झाले. याप्रसंगी उपमहापौर गणेश सोनवणे, नगरसेवक अमर जैन, आशा फाउंडेशनचे गिरीश कुळकर्णी, डॉ. सुदर्शन अयंगार, अखिल भारतीय नयी तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, पत्रकार दिलीप तिवारी, हर्ष धारा आदी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून अनुभूती स्कूलमध्ये हा फेअर आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी शहरातील अन्य शाळांच्या विद्याथ्र्याना, शहरवासीयांना हा अनोखा उपक्रम अनुभवता यावी यासाठी त्याचे यंदा व्यापक प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
78 रंजक खेळ
स्कूलच्या विद्याथ्र्यानी आपल्यातील सुप्त गुणांच्या जोरावर विद्याथ्र्यासाठी ‘खेळता-खेळता शिका व शिकता-शिकता खेळा’ या संकल्पनेवर आधारित मोठय़ा कल्पकतेने व सृजनशीलतेला वाव या प्रदर्शनात देण्यात आलेला आहे. यात बुद्धिमत्तेला चालना देणारे 78 रंजक खेळ, मनोरंजन, जादूचे प्रयोग, फुलांची दुनिया, स्नोवल्र्ड, सीवल्र्ड, फॅन्सी लॅण्ड, मुलांनी साकारलेले 50 पेक्षा अधिक हस्तकला, भन्नाट भूलभुलैय्या, विद्याथ्र्यांनी साकारलेला पपेट शो, चटकदार खाऊगल्लीत स्वादीष्ट पदार्थांचे दालनदेखील येथे आहे. अशा अनेक धमाल गोष्टी ‘एडय़ुफेअर-2018’मध्ये अनुभवता येत असून विद्याथ्र्यासह पालकासाठी मनोरंजनाची धमाल मेजवानीच ठरत आहे.
तीन दिवसीय या प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन निशा जैन व प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले.
‘एडय़ुफेअर’ बुद्धिमत्तेला चालना देणारा - अशोक जैन
विद्याथ्र्याच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन या आगळ्य़ा वेगळ्य़ा एडय़ुफेअरचे आयोजन केले आहे. बालगोपाळांना येथे भरपूर शिकायला मिळून बुद्धिला चालना मिळेल. मी स्वत: या प्रदर्शनात सहभागी झालो, रमलो. मला बालपणाची अनुभूती आली, अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी व्यक्त केली.