देश पातळीवर जळगावला असाही बहुमान, डॉ. हेमकांत बाविस्कर राष्ट्रीय आयुर्वेद गुरू, नेत्रचिकित्सा पदावर नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 06:45 PM2023-03-27T18:45:06+5:302023-03-27T18:45:14+5:30

देशातील तीन निवडक राष्ट्रीय आयुर्वेद गुरूंपैकी दोन केरळचे आहेत.

Jalgaon is also honored at the country level, Dr. Hemkant Baviskar appointed as National Ayurveda Guru, Ophthalmology | देश पातळीवर जळगावला असाही बहुमान, डॉ. हेमकांत बाविस्कर राष्ट्रीय आयुर्वेद गुरू, नेत्रचिकित्सा पदावर नियुक्त

देश पातळीवर जळगावला असाही बहुमान, डॉ. हेमकांत बाविस्कर राष्ट्रीय आयुर्वेद गुरू, नेत्रचिकित्सा पदावर नियुक्त

googlenewsNext

अमित महाबळ

जळगाव : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात जळगावचे डॉ. हेमकांत बाविस्कर यांची ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरू - नेत्रचिकित्सा’ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील तीन निवडक राष्ट्रीय आयुर्वेद गुरूंपैकी दोन केरळचे आहेत, तर महाराष्ट्रातील डॉ. बाविस्कर हे एकमेव आहेत, अशी माहिती सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

डॉ. बाविस्कर म्हणाले की, नेत्रविकारांसाठी ते स्वत: आणि केरळ येथील नारायण नंबूदिरीपाद हे संपूर्ण भारतात राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ मान्यताप्राप्त आयुर्वेद नेत्रतज्ज्ञ आहेत. काचबिंदू, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांना वारंवार सूज येणे, लहान मुलांच्या डोळ्यांच्या नंबरमध्ये सतत होणारी वाढ, मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारा परिणाम यावर ते यशस्वी उपचार करत आहेत. आयटी क्षेत्र व इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या वाढत्या वापरामुळे ड्राय आय सिंड्रोमची समस्या सर्वदूर जाणवत आहे, त्यावर आयुर्वेद चिकित्सा पद्धतीद्वारे औषधोपचार करता येतात.

अशी होते निवड...

- भारत सरकारकडून दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद गुरूची निवड केली जाते. डॉ. बाविस्कर यांनी केलेल्या अर्जानुसार राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ संचालक समितीतर्फे डॉ. गुप्ता व डॉ. हरिष सिंग यांनी जळगावमध्ये येऊन वैद्यकीय कार्य, आयुर्वेदातील संशोधन व आयुर्वेदासाठी असलेली सामाजिक जाणीव याची माहिती घेतली होती. त्यानंतर डॉ. बाविस्कर यांची नियुक्ती झाली आहे.

विद्यार्थी संशोधनासाठी येणार...

- राष्ट्रीय आयुर्वेद गुरू डॉ. बाविस्कर यांच्या अंतर्गत दोन निवडक विद्यार्थ्यांना परीविक्षेसाठी पाठविण्यात आले आहे. ते राजस्थान व मध्य प्रदेशातील आहेत. सध्या फक्त दिल्ली व गोवा येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद स्थापन करण्यात आले आहे. ते जळगावलाही व्हावे, असे मत डॉ. बाविस्कर यांनी व्यक्त केले.

Web Title: Jalgaon is also honored at the country level, Dr. Hemkant Baviskar appointed as National Ayurveda Guru, Ophthalmology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.