Jalgaon: सेट परीक्षेचे प्रवेशपत्र काढले का, जळगावात रविवारी आहे परीक्षा
By अमित महाबळ | Published: March 24, 2023 08:11 PM2023-03-24T20:11:03+5:302023-03-24T20:11:26+5:30
Jalgaon: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत जळगाव शहरातील आठ केंद्रावर ३८ व्या राज्यस्तरीय सेट (राज्यस्तरीय पात्रता चाचणी) परीक्षेचे आयोजन रविवारी (दि. २६) करण्यात आले असून, ३६०२ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.
- अमित महाबळ
जळगाव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत जळगाव शहरातील आठ केंद्रावर ३८ व्या राज्यस्तरीय सेट (राज्यस्तरीय पात्रता चाचणी) परीक्षेचे आयोजन रविवारी (दि. २६) करण्यात आले असून, ३६०२ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मूळजी जेठा महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद भवन-अ आणि ब, केसीई आयएमआर, केसीईचे अभियांत्रिकी महाविद्यालय, बाहेती महाविद्यालय, ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, केसीईचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, ओरीयन सीबीएसई स्कूल या आठ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र हे setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेचा अर्ज भरतेवळी वापरलेला लॉगीन व पासवर्डचा उपयोग करुन हे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यास अडचण आल्यास सेट परीक्षेचे संपर्क व्यक्ती तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.