जळगावात कथ्थक रुजतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 04:43 PM2017-09-03T16:43:03+5:302017-09-03T16:43:40+5:30

जळगाव शहरात आता कथ्थक हा नृत्य प्रकार हळूहळू पालकांमध्ये रूजतोय. पालक आपल्या मुलींना शास्त्रीय नृत्य शिकवू पहात आहेत हे नुकतेच गंधे सभागृहात प्रभाकर कला संगीत अकादमीला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते पाहात असताना सहजपणे जाणवले. प्रभाकर कला अकादमीच्या संचालिका डॉ.अपर्णा भट यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला हे श्रेय द्यावे लागेल. डॉ. भट यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. -विजय पाठक

Jalgaon kathak rujtey | जळगावात कथ्थक रुजतेय

जळगावात कथ्थक रुजतेय

Next

जळगाव शहरात कथ्थकची सुरवात ही यादवेंद्रकुमार लाम्भाते यांनी केली. लाम्भाते यांनी जळगावात आपले जे शिष्य निर्माण केले त्यात अपर्णा भट या एक आहेत. सतत 19 वर्षे यादवेंद्रकुमार लाम्भाते यांच्याकडे कथ्थकचे शिक्षण घेतले. नंतर डॉ. पुरू दाधीच यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी कथ्थक नृत्यात केली. पुण्याच्या विख्यात कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन घेत नृत्याचे कार्यक्रम करण्यास स्वतंत्रपणे सुरवात केली. दरम्यान, जळगावात कथ्थकचे स्वतंत्र क्लासेस अपर्णा भट यांनी सुरू केले होते. नृत्यातच करियर करायचे हे निश्चित करून 26 जून 1996 रोजी प्रभाकर कला संगीत अकादमीची स्थापना केली. या वेळी त्यांच्या पाठीशी त्यांचे वडील ठामपणे उभे राहिले. पायाला घुंगरू बांधून नृत्यास उभे राहणे कमीपणाचे समजले जाण्याची त्यावेळी पालकांची मानसिकता असताना नृत्यात करियर करण्यास सांगणे हे धाडसाचे होते. या धाडसाबद्दल अपर्णा भट नेहमीच वडील आणि कुटुंबीय यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करतात. गेल्या 21 वर्षात सात हजारावर विद्यार्थिनी या अकादमीतून नृत्याचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत. मुलींना केवळ क्लासमध्ये नृत्य शिकवून येत नाही तर त्यांना स्टेज मिळवून देणे, त्यांचे नृत्याचे कार्यक्रम घडवून आणणे गरजेचे असते. स्टेजवर परफॉर्मन्स करूनच नृत्यात सुधारणाही होत असते यासाठी जाणीवपूर्वक प्रय}ांची गरज असते आणि ते आपण करीत असल्याचे अपर्णा सांगतात. जळगावात होत असलेले खान्देश महोत्सव, बहिणाबाई महोत्सव, बालगंधर्व संगीत महोत्सव वेळोवेळी होणारे अन्य काय्रक्रम यातून मुलींना स्टेज परफार्मन्सची संधी मिळत असते. शहरात नृत्याच्या वातावरणासाठी शास्त्रीय संगीत नृत्याचे कार्यक्रम होणे गरजेचे असले तरी तसे होत नसल्याची खंत त्या व्यक्त करतात आणि यावर पर्याय म्हणून गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने अकादमीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थिनींचा कार्यक्रम घडवून आणतात. यामुळे लाइव्ह परफॉर्मन्स सादर करण्याची या विद्यार्थिनींना संधी मिळते. पालकांनादेखील आपल्या मुली नेमके काय शिकत आहेत हे त्यांना पाहता येते. गेल्या 21 वर्षाच्या विचार करता या अकादमीच्या 12 विद्यार्थिनींनी अपर्णांसोबत देशाबाहेर दुबईत जावून आपला कलाविष्कार सादर केला. देशात मुंबई, पुणे, नाशिक, खंडवा, जळगाव शहर अणि जिल्ह्यादेखील कार्यक्रम सादर केले. दोन मुलींनी एम.ए. कथ्थक केले असून कथ्थक हेच करीयरसाठी निवडले आहे ही कौतुकाची बाब आहे. आज पुण्या-मुंबई, नाशिकहून जळगावला येणा:या आणि कथ्थक शिकू इच्छिणा:यांना जळगावला अपर्णा भट यांना भेटा असे सांगितले जाते. यातच प्रभाकर कला अकादमीचे यश सामावलेले आहे. आज पालक केवळ हॉबी म्हणून नृत्याकडे पहात आहेत. ब:याचदा पालकांचा कर्मठपणादेखील आडवा येत असल्याचे पूर्वी दिसत असे, ती स्थिती बदलली आहे. आठवीपयर्ंत शिकू दिल्यानंतर नृत्याच्या क्लासमधून काढून घेण्याची मानसिकता होती. आता किमान बारावीपयर्ंत मुली शिकत आहेत. विशारद पूर्ण करत आहेत, ही समाधानाची बाब आहे. यातूनच त्यांनी केवळ हौस म्हणून न पाहता करीयर म्हणून पहावे पालकांनी पाठिंबा द्यावा,अशी अपेक्षा डॉ.अपर्णा भट व्यक्त करतात. जळगावच्या सांस्कृतिक वाटचालीत कथ्थक नृत्यशैलीचे कलावंत तयार होत आहेत ही समाधानाची बाब आहे.

Web Title: Jalgaon kathak rujtey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.