जळगाव कृषी बाजार समिती वादाची होणार चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:21 PM2019-06-26T12:21:04+5:302019-06-26T12:22:14+5:30
एकनाथराव खडसे यांची हस्तक्षेपाची मागणी
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची पाडलेली भिंत बांधून देण्यासंदर्भात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत यासंदर्भात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केल्यानंतर बंद बाबत माहिती घेऊन याबाबत तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे़ दरम्यान, दुसरीकडे जळगावात मात्र, व्यापाऱ्यांनी बंदवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे़
व्यापारी संकुलासाठी ८ जूनच्या पहाटेच कृषी उत्पन्न बाजार समितीची सुमारे तीनशे मीटर लांब असलेली संरक्षण भिंत विकासकाने जमिनदोस्त केली होती़ कुठलीही परवानगी नसताना ही भिंत जमिनदोस्त करण्यात आल्यामुळे आमचा माल उघड्यावर आला आहे, त्यामुळे ही भिंत बांधून द्यावी, अशी मागणी करी आडत असोसिएशनच्या माध्यमातून बंद पुकारण्यात आला होता़ पाच दिवसांच्या आश्वासनाने हा बंद मागे घेण्यात आला, मात्र, तरीही भिंत बांधली जात नसल्याने व्यापाºयांनी १७ जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे़
काय म्हणाले एकनाथराव खडसे
व्यापाºयांनी बंद पुकारल्यामुळे बाजार समितीतील काम ठप्प आहे़ तेथे नियमबाह्य काम केले जातेय म्हणून व्यापाºयांनी तो बंद पुकारला आहे़ त्यामुळे शेतकºयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ भाजीपाला महाग झाला आहे़ अनेक दिवसांपासून हा बंद असल्याने शेतकºयांना मोठ्या अडचणी आलेल्या आहेत़ जे नियमात, कायद्यात बसत असेल त्याची तपासणी करून हा व्यवहार सुरळीत करावा व सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार पूवर्वत होण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने मदत करावी, अशी मागणी खडसे यांनी केली़ यावर बंद बाबत माहिती घेऊन तो मागे घेण्यासंदर्भात व तक्रारीबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे़