जळगावात वकीलाचे घर फोडले
By admin | Published: July 15, 2017 12:50 PM2017-07-15T12:50:04+5:302017-07-15T12:50:04+5:30
घरातून चोरटय़ांनी 45 हजाराच्या दागिन्यांसह रोकड लांबविल्याची घटना
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 15 - पुणे येथे मुलाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आदर्शनगरातील मकरा पार्कमधील अॅड़ अशोक पुंडलिक चौधरी यांच्या कुलूपबंद घरातून चोरटय़ांनी 45 हजाराच्या दागिन्यांसह रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आह़े याप्रकरणी नगरसेविकेच्या पतीसह रामानंदनगर पोलीस ठाणे गाठूनही पोलिसांनी तक्रार न घेतल्याची माहिती चौधरी यांनी दिली़ आदर्शनगरातील मकरा पार्क येथील प्लॉट नं 19 मध्ये अॅड़ अशोक चौधरी हे पत्नी सुभद्रासह वास्तव्यास आहेत़ ते जिल्हा न्यायालयात वकील म्हणून व्यवसाय करतात़ त्यांचा मुलगा निखिल पुण्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो पत्नी स्नेहलसह पुणे येथेच वास्तव्यास आह़े मुलाची भेट घेण्यासाठी अॅड़अशोक चौधरी हे पत्नीसह शनिवार, 8 रोजी रात्री 8़30 वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्सने पुण्याला गेले होत़ेपुण्याहून परतल्यावर चोरी उघडअॅड़ अशोक चौधरी ते सात दिवसानंतर शुक्रवार, 14 रोजी दुपारी 3़30 वाजता पुण्याहून घरी परतल़े त्यांना तळमजल्यावरील घराचा दरवाजा उघडा दिसला़ घरात शिरल्यावर लाकडी कपाट तोडलेले तर त्यातील दागिने असलेला बॉक्स व त्यामधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला़ त्यांनी लागलीच याबाबत रामानंदनगर पोलिसांना कळविल़े गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पाहणी केली व पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला या असे सांगून निघून गेल़ेलग्नाच्या दागिन्यांसह रोकड लांबविली19 एप्रिल 2017 रोजी म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी रोजी अॅड़चौधरी यांचा मुलगा या निखील याचा विवाह पार पडला़ लग्न झाल्यानंतर वरच्या मजल्यावर आई-वडील तर खाली निखील राहत होता़ निखीलच्या लग्नावेळीचे सुनेचे दागिने लाकडी कपाटात ठेवले होत़े चोरटय़ांनी सोन्याच्या 45 हजाराच्या दागिन्यांसह दहा हजाराची रोकड लांबविल्याचे अॅड़चौधरी यांनी सांगितल़े