जळगाव एलसीबीच्या खुर्चीवर अखेर सुनील कुराडेंचीच वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 04:04 PM2017-10-12T16:04:29+5:302017-10-12T16:06:03+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षकानंतर जिल्ह्यात सर्वात महत्वाचे पद असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे यांची वर्णी लागली आहे. या खुर्चीसाठी जिल्ह्यातील अनेक अधिकारी स्पर्धेत होते. जामनेर, मुक्ताईनगर येथील संबंध तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी असलेली जवळीक कराडे यांना या खुर्चीपर्यंत घेऊन गेली आहे.

At the Jalgaon LCB chair, finally, Sunil Kuradenichi's castle | जळगाव एलसीबीच्या खुर्चीवर अखेर सुनील कुराडेंचीच वर्णी

जळगाव एलसीबीच्या खुर्चीवर अखेर सुनील कुराडेंचीच वर्णी

Next
ठळक मुद्देजळगाव पोलीस दलात फेरबदल  राजेशसिंह चंदेल मानव संसाधन विभागातएलसीबीसाठी अनेक जण होते रांगेत

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : जिल्हा पोलीस अधीक्षकानंतर जिल्ह्यात सर्वात महत्वाचे पद असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे यांची वर्णी लागली आहे. या खुर्चीसाठी जिल्ह्यातील अनेक अधिकारी स्पर्धेत होते. जामनेर, मुक्ताईनगर येथील संबंध तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी असलेली जवळीक कराडे यांना या खुर्चीपर्यंत घेऊन गेली आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी रात्री उशिरा जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल केले. कुराडे यांना स्थानिक गुन्हे शाखेत संधी दिल्यानंतर तेथील निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मानस संसाधन विभागात पाठविण्यात आले आहे. कुराडे यांच्या जागी रामानंद नगरचे बी.जी.रोहम यांची नियुक्ती केली आहे तर शहर वाहतूक शाखेचे सतीश भामरे यांना रामानंद नगर पोलीस स्टेशन देण्यात आले. जिल्ह्यात नव्याने आलेले व मुळचे जिल्ह्यातीलच असलेले विलास सोनवणे यांची शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. भुसावळ शहरला कार्यरत असलेले वसंत मोरे यांना टीएमसी सेलचे प्रमुख करण्यात आले आहे.


दुय्यम अधिकाºयांच्या बदल्या
या प्रभारी अधिकाºयांच्या व्यतिरिक्त जिल्हा नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे यांना अमळनेर उपअधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून नियुक्त देण्यात आली आहे. उपनिरीक्षक मुनसफखा पठाण यांची जिल्हा वाहतूक शाखेत,अनंत नेमाने यांची स्थानिक गुन्हे शाखेतील सायबर कक्षात तर रामानंद नगरचे उपनिरीक्षक राजेश घोळवे यांची चाळीसगाव शहर येथे व रोहीदास ठोंबरे यांची रामानंद नगर पोलीस स्टेशनला नियुक्ती झाली आहे.


एलसीबीसाठी अनेक जण होते रांगेत
स्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागावी यासाठी जामनेरचे नजीर शेख हे प्रामुख्याने आघाडीवर होते. त्यानंतर बोदवडचे निरीक्षक अनिरुध्द आढाव, नव्याने जिल्ह्यात आलेले विलास सोनवणे, भुसावळ बाजार पेठचे चंद्रकांत सरोदे यांच्यासह आणखी दोन निरीक्षक स्पर्धेत होते. या सर्वांना मुक्ताईनगर, जामनेरसह मुंबई, नाशिक वाºया केल्या मात्र, त्याच वरचढ ठरले ते कुराडेच. दरम्यान, एमआयडीसी येथे बी.जी.रोहम यांची नियुक्ती झालेली असली तरी त्या पोलीस स्टेशनची हद्द व जातीय तणावाच्या घटना पाहता रोहम यांच्या जागी दुसºया अधिकाºयाची नियुक्ती होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.

Web Title: At the Jalgaon LCB chair, finally, Sunil Kuradenichi's castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.