जळगावात लोकसंघर्ष मोर्चाचा ‘लढेगे...जितेंगे’ चा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 05:08 PM2018-02-08T17:08:31+5:302018-02-08T17:14:54+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या : हक्कासाठी निघालेल्या एल्गार मोर्चाने वेधले लक्ष
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.८- लोक संघर्ष मोर्चातर्फे गुरुवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. अत्यंत शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या या मोर्चात दोन हजारावर आदिवासी, दलित व मुस्लीम बांधव सहभागी झाले. लोकसंघर्ष मोर्चात ‘लढेगे...जितेंगे’चा नारा देण्यात आला.
या मोर्चाला दुपारी १ वाजता डॉ.शामा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून प्रारंभ झाला. मोर्चाचे नेतृत्त्व प्रतिभा शिंदे, प्रकाश बारेला, सचिन धांडे, धर्मा बारेला, फिरोज तडवी, झिलाबाई वसावे, लता झाल्टे, भरत बारेला, मुकुंद सपकाळे यांनी केले. मोर्चा नेहरू पुतळा, कोर्ट चौक, स्टेट बँक चौक, नवीन बसस्थानक मार्गे स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आला.
निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिका-यांनी रस्त्यावर यावे...
मोर्चेकºयांनी निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी यावे अशी मागणी केली. जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्विकारण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका मोर्चेकºयांनी घेतली. पोलिसांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ न्यावे असे आवाहन केले. मात्र मोर्चेकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते.
मोर्चात बुधा बारेला, कुर्बान तडवी, मुस्तफा तडवी,केशव वाघ, अतुल गायकवाड, चंद्रकांत चौधरी,रमेश बारेला, पंडू बारेला, ताराचंद पावरा, संजय बारेला, प्रेमसिंग बारेला यांच्यासह आदिवासी सहभागी झाले.