प्रातःकालीन मैफिलीने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

By विलास बारी | Published: November 14, 2023 07:36 PM2023-11-14T19:36:08+5:302023-11-14T19:36:20+5:30

प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे मयूर पाटील यांनी गुरुवंदना सादर केली.

Jalgaon lovers mesmerized by the morning concert | प्रातःकालीन मैफिलीने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

प्रातःकालीन मैफिलीने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

जळगाव : कला व संस्कृती संचालनालय, गोवा व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पाडवा पहाट चे आयोजन महात्मा गांधी उद्यानात करण्यात आले होते. या मैफिलीस कै. नथुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे सहकार्य  लाभले.

प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे मयूर पाटील यांनी गुरुवंदना सादर केली. मेजर नानासाहेब वाणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे तसेच विश्वस्त डॉ. अपर्णा कासार यांनी कलावंतांचे स्वागत केले. त्यानंतर सुरू झाला स्वरसखींचा स्वरप्रवास.  सुरवातीला राग नटभैरव रागातील विलंबित एकतालातील बडा ख्याल  "ओ समझत नाही " हा ख्याल अत्यंत दमदार पणे सादर केला त्यानंतरची तिनतालातील बंदिश “जान करीये, गुण की चर्चा सो” 

राग नटभैरव मधील जय जय गौरी शंकर नाटकातील वसंत देसाई यांनी संगीत बद्ध केलेले नाट्यपद सादर केले. त्यानंतर दोन भारतरत्नांनी गाऊन अजरामर केलेले ‘बाजे मुरलिया बाजे’ हे गीत सादर करून कार्यक्रम एका उंचीवर नेला. समर्थ रामदासांची रचना सादर केली. कार्यक्रमाचा समारोप सं. कटयार काळजात घुसली या नाटकातील अजरामर गीत ‘सूरत पिया बीन’ हे गीत सादर करून पाडवा पहाट या मैफिलीची सांगता झाली. आभार प्रदर्शन दिपक चांदोरकरांनी केले. तसेच 22 व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. 5, 6, 7 जानेवारिस होणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.

Web Title: Jalgaon lovers mesmerized by the morning concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव