जळगाव बाजार समितीमध्ये हरभऱ्याला केवळ ३४०० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:05 PM2018-04-12T13:05:03+5:302018-04-12T13:05:03+5:30

हमी भावापेक्षा एक हजाराची तफावत

In the Jalgaon Market Committee, only Rs 3400 | जळगाव बाजार समितीमध्ये हरभऱ्याला केवळ ३४०० रुपये भाव

जळगाव बाजार समितीमध्ये हरभऱ्याला केवळ ३४०० रुपये भाव

Next
ठळक मुद्देदर्जानुसार भाव दिला जात असल्याची सबबदररोज ४०० ते ५०० क्विंटल आवक

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १२ - हरभºयाला शासनाने ४४०० रुपये हमी भाव जाहीर केला असला तरी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र हमी भावापेक्षा तब्बल एक हजार रुपये कमी भाव देऊन हरभरा खरेदी केली जात आहे. मालाचा दर्जा पाहून भाव दिला जात असल्याची सबब पुढे करून हरभºयाला ३३५० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकºयांची कुचुंबना होत आहे. दरम्यान, बाजार समितीमध्ये चार प्रकारच्या हरभºयाची आवक सुरू असून त्यांचे भाव वेगवेगळे आहे. यामध्ये गुलाबी हरभºयाला ४००० ते ४७५० तर काबुली हरभºयाला ४४०० ते ४४७५ रुपये भाव मिळत आहे.
साधारण रब्बी हंगाम संपत आल्यानंतर हरभरा खरेदी सुरू होते. बाजार समितीसह शासकीय खरेदी केंद्रांद्वारेही ही खरेदी केली जाते. बाजार समितीमध्ये व्यापाºयांकडून ही खरेदी केली जाते. त्यानुसार जळगाव बाजार समितीमध्ये यंदादेखील व्यापाºयांमार्फत खरेदी सुरू झाली आहे.
भावामध्ये एक हजाराचा फरक
शासनाने यंदा हरभºयाला ४४०० रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे. त्यानुसार शेतकºयांच्या मालाला भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र यंदा बाजार समितीमध्ये केवळ ३३५० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. शेतकºयांच्या मालाला भाव मिळावा म्हणून हमी भाव सरकार जाहीर करीत असले तरी बाजार समितीमध्ये मात्र थेट १००० ते १०५० रुपये प्रति क्विंटलने भाव कमी दिला जात असल्याचे चित्र आहे.
दर्जानुसार भाव
हमी भावापेक्षा एक हजार रुपयांनी भाव कमी दिला जात असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर मालाच्या दर्जानुसार भाव दिला जात असल्याची सबब पुढे केली जात आहे.
दररोज ४०० ते ५०० क्विंटल आवक
जळगाव बाजार समितीमध्ये दररोज ४०० ते ५०० क्विंटल हरभºयाची आवक सुरू आहे. यामध्ये काही शेतकरी व्यापाºयांकडे माल आणतात, मात्र भाव वाढीची प्रतीक्षा करीत विक्री करीत नसल्याचेही चित्र आहे. दररोज एवढी आवक असताना एका क्विंटलला एक हजार रुपयाने कमी भाव मिळत असेल तर दररोज लाखो रुपयांची तफावत दिसून येते.
शासकीय खेरदीसाठी गोदामांचा शोध
जळगावात अद्यापही शासकीय हरभरा खरेदी सुरू झालेली नाही. या खरेदीसाठी केवळ शेतकी संघाच्या कार्यालयात नोंदणी सुरू असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र गोदामच उपलब्ध होत नसल्याने शासकीय खरेदीस मुहूर्त लागत नसल्याचे चित्र आहे. म्हसावद येथे शेतकी संघाचे गोदाम आहे, मात्र मध्यवर्ती ठिकाणी केंद्र असावे यासाठी जळगाव शहरात गोदामाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. वखार महामंडळाकडून हे गोदाम उपलब्ध करून दिले जाणार असून साधारण आठवडाभरात शासकीय खरेदी सुरू होईल अशी माहिती मिळाली.
शासकीय केंद्रांवर विक्रीसाठी चांगला माल राखीव
बाजार समितीमध्ये हरभरा नेला जात असला तरी तो एफएक्यू दर्जाचा नसल्याचे सांगितले जात आहे. चांगल्या दर्जाचा माल शासकीय खरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी शेतकरी चांगल्या दर्जाचा माल राखील ठेवत असल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव बाजार समितीमध्ये चार प्रकारच्या हरभºयाची आवक सुरू आहे. यामध्ये गुलाबी हरभºयाला ४००० ते ४७५० रुपये, चिनोरी (काबुली) हरभ-याला ४४०० ते ४४७५, साधा हरभरा ३३५० ते ३४००, हरभरा व्ही - २ (मोठा) ३८५० रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभºयास व्यापाºयांकडून ३३५० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे. ज्या दर्जाचा माल येतो, त्यानुसार व्यापा-यांकडून भाव दिला जातो.
- आर.डी. नारखेडे, सचिव, कृउबा, जळगाव.

हरभºयाच्या शासकीय खरेदीसाठी गोदाम पाहिले जात आहे. सध्या शेतकºयांची नोंदणी सुरू असून आठवडाभरात शासकीय खरेदी सुरू होईल.
- परिमल साळुंखे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

Web Title: In the Jalgaon Market Committee, only Rs 3400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.