जळगावच्या बाजारपेठेत अद्रक वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:09 PM2019-05-17T13:09:26+5:302019-05-17T13:11:06+5:30

दर दीड पटीने वाढले

Jalgaon market has started rising | जळगावच्या बाजारपेठेत अद्रक वधारले

जळगावच्या बाजारपेठेत अद्रक वधारले

Next

जळगाव : वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने अद्रकचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत अद्रकचे दर जवळपास दीड पटीने वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.
गेल्या आठवड्यात २३०० ते ५१०० रुपये प्रती क्विंटल असलेल अद्रकचे दर हे २५०० ते ७००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. अद्रकसह इतरही भाज्यांचे दर वाढतच आहे. गेल्या आठवड्यात वधारलेले वांग्याचे दर या आठवड्यात कमी झाले असून त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. कांद्याची आवक वाढली असून त्याचे दर कमी होऊन ३०० ते ८०० रुपये प्रती क्विंटल असा दर कांद्याला मिळत आहे.
या सोबतच कारले २००० ते ३५०० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. भोपळा १४०० रुपये प्रती क्विंटल, बटाटे ४०० ते १०५० रुपये प्रती क्विंटल, भेंडी १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल, कैरी ६०० ते १३०० रुपये प्रती क्विंटल, खिरा ७०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - १२०० ते २४०० रुपये प्रती क्विंटल, गवार - ३८०० रुपये प्रती क्विंटल, कोथिंबीर - २५०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल, मेथी ५००० रुपये प्रती क्विंटल, पालक १४०० रुपये प्रती क्विंटल, टमाटा १००० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, हिरवी मिरची १००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल, पोकळा - ६०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, गिलके २००० ते ३००० रुपये प्रती क्विंटल, चवळी शेंगा - १८०० ते ३१०० रुपये प्रती क्विंटल.

Web Title: Jalgaon market has started rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव