जळगाव बाजारसमितीमध्ये टोमॅटोचे भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:17 PM2018-12-14T13:17:45+5:302018-12-14T13:18:14+5:30

भाजीपाला : आवक वाढून भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

In Jalgaon market, prices of tomatoes declined | जळगाव बाजारसमितीमध्ये टोमॅटोचे भाव घसरले

जळगाव बाजारसमितीमध्ये टोमॅटोचे भाव घसरले

Next

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या भावात ३०० रुपये प्रतिक्विंटलने घट होऊन लाल टोमॅटो ७०० रुपये प्रतिक्विंटलवरून ४०० रुपये प्रतिक्विंटलवर आले. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भाव कमी झाले आहेत. 

टोमॅटोची आवक कमी होऊन गेल्या महिन्यात भाव १५०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते. मात्र, या आठवड्यात ते घसरून थेट ३०० रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले आहेत. कांद्याचे भाव कमी होऊन ते ७५० रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. सध्या भेंडीचे भाव १५०० रूपये प्रतिक्विंटल झाले आहेत. कारल्याचे भाव १५०० रुपये आहे. वांगे दर ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.आहेत. कोथिंबीरचेही भाव २५०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. पत्ताकोबी २० तर फु लकोबी ३० रू. प्रतिकिलो, आहे.

Web Title: In Jalgaon market, prices of tomatoes declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.