जळगाव एमआयडीसीत भाविकास लुटणा-या चोरट्यास १६ तासात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:21 PM2018-02-14T22:21:43+5:302018-02-14T22:23:05+5:30
महादेवाचे दर्शन घेऊन परत जाणाºया देशदीपक केसरीनंदन शुक्ला उर्फ राधे शुक्ला (वय ३८, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाला मारहाण करुन लुटणाºया प्रशांत पंडित साबळे (वय २२, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याचा दुसरा साथीदार फरार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि १४, : महादेवाचे दर्शन घेऊन परत जाणाºया देशदीपक केसरीनंदन शुक्ला उर्फ राधे शुक्ला (वय ३८, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाला मारहाण करुन लुटणाºया प्रशांत पंडित साबळे (वय २२, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याचा दुसरा साथीदार फरार आहे.
एमआयडीसीत आरटीओतर्फे वाहनांची ब्रेक चाचणी ज्या रस्त्यावर घेतली जाते. त्या ठिकाणी बंद पडलेल्या टायटन स्टील कंपनीच्या समोर महादेवाचे मंदिर आहे. शुक्ला या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आला होता. दर्शन घेतल्यानंतर पुढे गेल्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी शुक्ला याला मारहाण करुन पाकीटातील चारशे रुपये हिसकावून पळ काढला होता. दरम्यान, ‘लोकमत’ मध्ये या घटनेचे वृत्त प्रसिध्द होताच पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी गुन्हे शोध पथकाला संशयित चोरटे व शुक्ला यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. शुक्ला यांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले. त्यांच्याकडून हकीकत समजून घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
सहायक निरीक्षक समाधान पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव व गोविंदा पाटील यांच्या पथकाने लुटणाºयाचा शोध घेतला असता त्यात क्र.एम.एच.१९ बी.बी.३३९६ ही दुचाकी निष्पन्न झाली. त्यानंतर प्रशांत साबळे याचे नाव समोर आले. सायंकाळी या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. साबळे हा अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.