जळगाव - मुंबई विमानसेवेने पर्यटन व रोजगाराला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:15 PM2017-12-20T13:15:10+5:302017-12-20T13:18:09+5:30

अजिंठा लेणी व लोणार सरोवरचा प्रवास होणार सुकर

Jalgaon - Moving from the Mumbai airport to tourism and employment | जळगाव - मुंबई विमानसेवेने पर्यटन व रोजगाराला मिळणार चालना

जळगाव - मुंबई विमानसेवेने पर्यटन व रोजगाराला मिळणार चालना

googlenewsNext
ठळक मुद्देपरदेशातील पर्यटकांचीही होणार सोय‘जळगाव डेस्टीनेशन’विषयी जनजागृती व्हावी

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20-  गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या विमानसेवेला जळगावातून 23डिसेंबरपासूनअखेर सुरुवातहोतअसल्यानेयेथे विविध संधी उपलब्ध होऊ पाहत आहे. यामध्ये शहर व परिसरात असलेल्या पर्यटन, धार्मिक स्थळांचा प्रवाससुकर होणार असल्याने पर्यटन वाढून रोजगाराच्याही संधी निर्माण होण्याचे आश्वासक चित्र आहे. या सोबतच देशातील इतर पर्यटनस्थळीही जाणे सोयीचे होणार असल्याने देशांतर्गत पर्यटन वाढीस चालणा मिळणार आहे. 
जळगाव येथे 2010मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते विमानतळाचे उद्घाटन झाले. मात्र गेल्या सात वर्षापासून येथे विमानसेवा सुरू न झाल्याने शहरवासीयांना तेव्हापासून विमानसेवेची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपून आता विमानसेवेचे स्वप्न 23 डिसेंबरपासून प्रत्यक्षात साकारणार असल्याने सर्वच क्षेत्रातील आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

पर्यटनवाढीस हवाईसेवेचा मोठा लाभ
ज्या ठिकाणी विमानसेवा आहे, त्या परिसरातील पर्यटनस्थळांचा मोठय़ा प्रमाणात विकास होण्यासह रोजरागाच्याही संधी उपलब्ध झाल्याचे दिसून येते. जळगावपासून 150 कि.मी. अंतरावर असलेले औरंगाबाद हे याचे उत्तम उदाहरण आहे. याच धर्तीवर आता जळगावातही विमानसेवेमुळे  मोठय़ा संधी निर्माण होण्याचे सुखद चित्र आहे. 

अजिंठा, लोणारसाठी सोयीचा मार्ग
जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीला दरवर्षी भेट देणा:या पर्यटकांची संख्या लाखोमध्ये असते. यामध्ये जवळपास 40 टक्के विदेशी पर्यटक असतात. विदेशी पर्यटकांसह देशातील विविध भागातील (डोमेस्टीक) पर्यटक अजिंठा लेणी येथे येण्यासाठी मुंबई, उदयपूर, जयपूर अथवा इतर ठिकाणाहून विमानाने औरंगाबाद येथे येतात. तेथून त्यांना वाहनाने अजिंठा लेणीत यावे लागते. हे अंतर 100 कि.मी. आहे. जळगाव-मुंबई विमानसेवेमुळे पर्यटक मुंबईहून थेट जळगावला येऊन अजिंठा लेणी येथे गेल्यास त्यांचे वाहनाने प्रवासाचे अंतर निम्म्यावर येऊन त्यांचा वेळही वाचू शकतो. जळगाव ते अजिंठा लेणी केवळ 55 कि.मी. अंतर असल्याने साधारण पाऊण तासात पर्यटक जळगावहून तेथे पोहचू शकतात. अजिंठा लेणी पाहून तेथून पर्यटकांना  लोणार सरोवर, वेरुळ लेणीला जाता येऊ शकते व तेथून औरंगाबाद परिसरातील पर्यटन स्थळास भेट देत तेथूनच विमानाने जाणे योयीचे ठरू शकते.  त्यामुळे अजिंठा लेणी, लोणार सरोवर, वेरुळ लेणी येथे जाणारे पर्यटक जळगावातून गेले तर पर्यटकांचा वेळ वाचू शकतो, असा सूर उमटत आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीेच्या गांधी तीर्थला पसंती
जळगाव येथे जैन हिल्स परिसरात उभारण्यात आलेल्या गांधी तीर्थ या पर्यटनस्थळासदेखील पर्यटक मोठय़ा प्रमाणात भेट देत असतात. महात्मा गांधी यांचे जीवनदर्शन घडविणा:या गांधी तीर्थला भेट देण्यासाठी देशभरासह विदेशातूनही पर्यटक येत असतात. विमानसेवेमुळे या पर्यटकांचा वेळ वाचून ते जळगाव जिल्ह्यातील पद्मालय या धार्मिक स्थळी तसेच जळगाव  शहरातील आर्यन पार्क येथे भेट देऊ शकतात व या सर्व ठिकाणी पर्यटनास चालना मिळेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

रोजगाराच्या संधी वाढणार
पर्यटक जळगावात येण्यास सुरुवात झाली तर त्यांना येथे राहण्याची सोय व्हावी म्हणून हॉटेल्स, लॉज सरसावतील. यासोबतच अनेकांच्या हाताला काम मिळेल. या शिवाय वाहन, प्रशिक्षित चालक यांनाही मागणी वाढून त्यांच्या हाताला काम मिळू शकेल. एकूणच सर्वच क्षेत्रात भरभराट येऊन व्यवसाय वाढीस चांगला वाव असल्याचेही सांगितले जात आहे.  

देशांतर्गत पर्यटन वाढणार
जळगाव येथून काश्मीर, राजस्थान, दक्षिण भारत तसेच देशातील बहुतांश धार्मिक स्थळी तसेच विदेशात पर्यटनास जाणा:या पर्यटकांचीही संख्या मोठी आहे. त्यासाठी ते येथून मुंबईत गेले व तेथून ‘कनेक्टेड’ विमानसेवेने इच्छित स्थळी कमी वेळात पोहचूून व तेथून याच मार्गाने परत येण्यास मदत मिळेल. यातून सर्वाचा वेळ, श्रम वाचू शकणार आहे. 

‘जळगाव डेस्टीनेशन’विषयी जनजागृती व्हावी
जळगाव परिसरात असलेल्या या पर्यटन, धार्मिक स्थळांविषयी माहिती व्हावी यासाठी जळगाव विमानतळासह मुंबई विमानतळावरही या विषयी डिजिटल काउंटरची सोय करण्यात येऊन जनजागृती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

विमानसेवेमुळे पर्यटन वाढीस मोठी संधी आहे. यामुळे आता पर्यटक इकडे येण्यास सुरुवात होऊन रोजगाराच्याही संधी वाढतील. त्यामुळे विमानसेवेचा अधिकाधिक लाभ घेतल्यास जळगावात व्यवसाय वाढीस मोठी संधी आहे. 
- समीर देशमुख, पर्यटन व्यावसायिक. 

Web Title: Jalgaon - Moving from the Mumbai airport to tourism and employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.