जळगाव -मुंबई विमानसेवेमुळे उद्योग व व्यापार घेणार ‘भरारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:47 PM2017-12-21T12:47:18+5:302017-12-21T12:49:30+5:30

औद्योगिक वसाहतीमध्ये भरभराटीची आशा

Jalgaon-Mumbai air service improve business | जळगाव -मुंबई विमानसेवेमुळे उद्योग व व्यापार घेणार ‘भरारी’

जळगाव -मुंबई विमानसेवेमुळे उद्योग व व्यापार घेणार ‘भरारी’

Next
ठळक मुद्देआयात-निर्यात वाढणारचहा व्यापा-यांना सोयीचा पर्याय

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21-  जळगाव ते मुंबई विमानसेवेमुळे उद्योग, व्यापार क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण असून हवाईसेवेमुळे हे क्षेत्र आता मोठी भरारी घेऊ शकेल, असा विश्वास उद्योजक व्यापा:यांकडून व्यक्त केला जात आहे. 
केंद्र सरकारच्या उडाण योजनेंतर्गत 23 जानेवारीपासून जळगावातून मुंबईसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याने या सेवेचे सर्वच क्षेत्रातून स्वागत केले जात आहे. 
उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन
जळगावातील औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन उद्योगांचे स्वागत होणार आहे. मात्र येथे येणा:या उद्योजकांना वेळेच्या बंधनामुळे अडचणी येतात. बहुतांश उद्योजक मुंबई येथे येऊन तेथूनच निघून जातात. मात्र आता विमानसेवेमुळे बाहेरचे उद्योजक येथे आल्यास ते येथे इतर उद्योजकांची पाहणी करून पुरेसा वेळ देऊ शकतील व यातून मोठा फायदा जळगावला होऊ शकतो. इतकेच नव्हे येथील उद्योजकांची भेट घेऊन जे मुंबईतूनच माघारी जातात त्यांना अजिंठा लेणीसारख्या पर्यटन क्षेत्रामुळे येथे निमंत्रित करता येईल व त्यांनी येथे प्रत्यक्ष वेळ घालविल्याने औद्योगिक संबंध अधिक दृढ होऊन उद्योग वाढीस यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले जात आहे. 
विदेशी उद्योजकांसाठी विमानसेवा पायघडय़ाच ठरणार
जळगावातून डाळ, प्लॅस्टीकसह वेगवेगळा माल विदेशात निर्यात होतो. तसेच काही कच्चा माल येथे आयात केला जातो. आता विमानसेवा सुरू झाल्याने विदेशी उद्योजक आपले लक्ष डाळ, प्लॅस्टीकनगरी असलेल्या जळगावकडे वळवतील व ते येथे आल्याने  जळगावसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे विमानसेवा म्हणजे विदेशी उद्योजकांसाठी पायघडय़ाच ठरणार असल्याचा सूर उमटत आहे. 
आयात-निर्यात वाढणार
बाहेरचे व्यापारी येथे आल्याने येथील उद्योगांची ते प्रत्यक्ष पाहणी करू शकतील. यामध्ये त्यांचा जळगावात गुंतवणुकीचा कल वाढण्यासह आयात-निर्यातीलादेखील फायदा होऊन आयात-निर्यात वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
व्यापार आणखी वाढणार
जळगावातील व्यापार क्षेत्रही मोठे आहे. खान्देशसह मराठवाडा, विदर्भ येथे माल जातो. येथील सुका मेवा, मसाले यासह दाणाबाजारातील प्रत्येक वस्तू येथून बाहेरगावी जाते. या मालाच्या आयातीचा विचार केला तर तो अरब राष्ट्र तसेच पाश्चात्य देशातून येत असतो. यासाठी आता विमानसेवेमुळे येथील व्यापारी कमी वेळेत देशातील वेगवेगळ्य़ा भागात व विदेशातही पोहचू शकतील. 
चहा व्यापा-यांना सोयीचा पर्याय
जळगावात चहा व्यापारही मोठा असून यासाठी व्यापा:यांना आसाम व इतर ठिकाणच्या व्यापा:यांशी संपर्क साधणे, त्यांची भेट घेणे यासाठी  जावे-यावे लागते. आता विमानसेवेमुळे चहा व्यापा:यांना कमी वेळात आसाम व इतर ठिकाणी जावे लागते. त्यांच्यासाठी आता हा पर्याय अत्यंत सोयीचे ठरणार आहे. 

विमानसेवेमुळे बाहेरच्या उद्योजकांना जळगावात येणे सोयीचे होणार असल्याने उद्योग वाढीस चांगली संधी आहे. यामुळे औद्योगिक विकास होण्यास मदत होईल. 
-प्रेम कोगटा, अध्यक्ष जळगाव दालमिल असोसिएशन. 

विमानसेवा व्यापा:यांना सोयीची ठरणार असून यामुळे व्यापार वाढीस आणखी वाव आहे. ही सेवा आता अखंडीत सुरू राहिली पाहिजे. 
-विजय काबरा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा व्यापारी

विमानसेवा उद्योगक्षेत्रासाठी पर्वणी ठरणार असून औद्योगिक विकासास चालना मिळणार आहे. 
-भुवनेश्वर सिंग, अध्यक्ष, जिंदा. 

जळगावात येण्यासाठी मोठय़ा उद्योजकांना अडचणी येत होत्या. आता विमानसेवेमुळे त्या दूर होऊन उद्योगांमध्ये भरभराट येईल. 
-विनोद बियाणी, कार्याध्यक्ष, जिंदा.

विमानसेवा जळगावच्या व्यापारवाढीसाठी वरदान ठरणार असून इतर ठिकाणच्या मोठय़ा व्यापा:यांना येणे सोयीचे होईल. येथील व्यापा:यांना मुंबई येथे जाऊन विमानाने इतरत्र जावे लागत होते. आता विमानसेवेमुळे वेळेची बचत होईल. 
-युसुफ मकरा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ.

जळगावात प्लॅस्टीक उद्योग मोठा असून विमानसेवेमुळे  प्लॅस्टीक तसेच चटई उद्योगास चालना मिळणार आहे. जे उद्योजक औरंगाबाद येथून निघून जात होते, ते जळगावात येऊ शकतील.     
- दिनेश राठी, अध्यक्ष, मॅट असोसिएशन.   

Web Title: Jalgaon-Mumbai air service improve business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.