टाईमस्लॉट अभावी जळगाव-मुंबई विमानसेवा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:32 PM2018-03-15T22:32:16+5:302018-03-15T22:32:16+5:30

शासनाचे दूर्लक्ष

 Jalgaon-Mumbai air service in problem due to the absence of Times Slots | टाईमस्लॉट अभावी जळगाव-मुंबई विमानसेवा अडचणीत

टाईमस्लॉट अभावी जळगाव-मुंबई विमानसेवा अडचणीत

Next
ठळक मुद्दे२४ मार्चनंतरचे तिकिट मिळणेही बंद नागरिकांची गैरसोय विमानतळ प्राधिकरणचे अधिकारीही अनभिज्ञ

जळगाव : मुंबई विमानतळावरून जळगाव विमानसेवेसाठी टाईमस्लॉट उपलब्ध होण्यात अडचण येत असल्याने ‘उडान’ योजनेंतर्गत मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली जळगाव-मुंबई विमानसेवा अडचणीत आली आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘उडान’ योजनेत नवे ४५ विमान मार्ग जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश असून जळगाव येथेही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे जळगाव ते मुंबईचे अंतर केवळ ९० मिनिटात पूर्ण करता येत असल्याने उद्योजक, व्यापारी, अधिकारी तसेच नागरिकांसाठी ही सेवा मोठी उपलब्धी ठरत आहे. त्यामुळे ही विमान सुरू होण्याच्या आठवडाभर आधीच सुमारे आठवडाभराची तिकिटे फुल्ल झाली होती. मात्र जेमतेम महिनाभर ही विमानसेवा सुरळीत चालत नाही तोच मुंबई विमानतळावरून टाईम स्लॉट मिळत नसल्याने या विमानसेवेत अडथळा निर्माण व्हायला लागला. अखेर ३१ डिसेंबरपासून आठवडाभरातून केवळ ३ दिवसच ही विमानसेवा सुरू आहे.
विमानतळ प्राधिकरणचे
अधिकारीही अनभिज्ञ
केवळ २४ मार्चपर्यंतचीच तिकिटीविक्री सुरू आहे. त्यानंतर विमानसेवा सुरू राहणार की नाही? याबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती नाही. एअरडेक्कनकडून याबाबत काहीही कळविण्यात आलेले नाही. तसेच पुणे किंवा अन्य शहरांना विमानसेवा सुरू करण्याबाबतही अद्याप काही हालचाल नसल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे संचालक विकास चंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
२४ मार्चनंतरचे तिकिट मिळणेही बंद
विमानसेवा पुरवित असलेल्या एअर डेक्कन कंपनीच्या वेबसाईटवर आॅनलाईन तिकिट बुकींगची सोय आहे. मात्र सध्या या वेबसाईटवर जळगाव-मुंबई विमानसेवेचे केवळ ३१ डिसेंबर ते २४ मार्चपर्यंतचेच वेळापत्रक लावण्यात आले असून या कालावधीतीलच विमानसेवेचे तिकीट विक्री होत आहे. २५ मार्चपासून पुढील तारखांना विमानसेवा बंदची सूचना दिसून येत आहे. कदाचित पुढील वेळापत्रक जाहीर झाल्यावर तिकीट विक्री सुरू होईल. मात्र याबाबत एअरडेक्कनच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता या विषयावर पत्रकारांशी न बोलण्याच्या कंपनीच्या सूचना असून जनसंपर्क विभागाशी बोला, असे सांगत या विषयावर माहिती देणे टाळण्यात आले.

Web Title:  Jalgaon-Mumbai air service in problem due to the absence of Times Slots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.