‘ट्रू जेट’ चालविणार जळगाव-मुंबई विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:33 AM2019-02-06T11:33:58+5:302019-02-06T11:35:28+5:30

व्यवस्थापक विकास चंद्रा यांची माहिती

Jalgaon-Mumbai airport to run 'True Jet' | ‘ट्रू जेट’ चालविणार जळगाव-मुंबई विमानसेवा

‘ट्रू जेट’ चालविणार जळगाव-मुंबई विमानसेवा

googlenewsNext
ठळक मुद्दे जळगाव विमानतळ प्रशासनाला आदेश प्राप्त

जळगाव : गेल्या चार महिन्यापासून बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरु होणार असून, उड्डाण योजनेतर्गंत तिसºया टप्प्यात ट्रू जेट ही विमान कंपनी जळगाव ते मुंबई विमानसेवा चालविणार आहे. याबाबत शासनाचे जळगाव विमानतळ प्राधिकरण प्रशासनाला नुकतेच आदेश प्राप्त झाले असल्याची माहिती जळगाव विमानतळाचे व्यवस्थापक विकास चंद्रा यांनी ‘ लोकमत’ शी बोलताना सांगितले.
गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर मागील वर्षी उड्डाण योजनेत २७ डिसेंबर २०१७ रोजी एअर डेक्कनची जळगाव ते मुंबई ही विमानसेवा सुरु झाली होती. मात्र, सुरुवातीपासून या विमानसेवेला अनिश्चित वेळेचे ग्रहण लागले होते. पहिल्या दिवसापासूनच प्रवाशांनी आगाऊ तिकीट बुकींग केल्यामुळे, सुरुवातीपासूनच प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.
परंतु, अधून-मधून सेवेला होत असलेला विलंब व बहुतांश वेळा तांत्रिक कारणामुळे ही सेवा खंडीत होत असल्याने, प्रवाशांनी काही दिवसातच या सेवेकडे पाठ फिरवली होती. गेल्या वर्षी तर जून मध्ये दीड महिने सेवा बंद होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून ही सेवा पूणर्पणे बंद झाली आहे.
एअर डेक्कनची सेवा अधून-मधून खंडीत पडत असल्यामुळे सरकारने या कंपनीला काळ््या यादीत टाकले होते.
त्यानंतर केंद्र शासनातर्फे ही सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यावेळी तिसºया टप्प्यातील निविदा प्रक्रियेत ट्रू जेट या विमान कंपनीने जळगाव ते मुंबई सेवा चालविण्यास तयारी दर्शविली आहे. या संबंधीचे शासनातर्फे जळगाव विमानतळ प्राधिकरणाला नुकतेच आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सेवा सुरु झाल्यावर व्यापारी-उद्योजकांना दिलासा मिळणार आहे.
 जळगाव विमानतळ प्रशासनाला आदेश प्राप्त
तर दुसऱ्या टप्प्यात ट्रूजेटने जळगाव-अहमदाबाद सेवेसाठी दाखविली तयारी
दुसºया टप्प्यात ट्रू जेट या विमान कंपनीने जळगाव ते मुंबई सेवा सुुरु करण्यास तयारी न दर्शविता, जळगाव ते मुंबई सेवा देण्यास दर्शविली होती. या संदर्भात ट्रू जेटच्या अधिकाºयांनी जळगावला येऊन, विमानतळाची पाहणीदेखील केली होती. मात्र, सेवा सुुरु करण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसून, तिसºया टप्प्यांत जळगाव ते मुंबई सेवा देण्यासाही याच कंपनीने तयारी दर्शविले असल्याचेही चंद्रा यांनी सांगितले.

Web Title: Jalgaon-Mumbai airport to run 'True Jet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.