जळगाव महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका मालामाल! वित्त आयोगातून भरघोस निधी

By सुनील पाटील | Published: April 4, 2023 06:36 PM2023-04-04T18:36:36+5:302023-04-04T18:37:08+5:30

पाणी साठवण व घनकचरा व्यवस्थापनासाठी २८६.५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे.

Jalgaon Municipal Corporation and the municipal goods in the district! Substantial funding from the Finance Commission | जळगाव महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका मालामाल! वित्त आयोगातून भरघोस निधी

जळगाव महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका मालामाल! वित्त आयोगातून भरघोस निधी

googlenewsNext

जळगाव - पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार नॉन मिलियन प्लस सिटीज अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत नगरपंचायत, नगरपालिका, ड वर्ग महापालिका क्षेत्रात विविध उपाययोजनांसाठी शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील ड वर्गातील १० महानगरपालिका व ४०० नगरपालिकांसाठी १९१ कोटी इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे.

पाणी साठवण व घनकचरा व्यवस्थापनासाठी २८६.५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. या दोन्ही योजनेतून जळगाव मनपाला ९ कोटी ४३  लाख ३० हजार ८२३ रुपयांचा तर उर्वरित १९ नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींनाही लाखोंचा निधी मिळणार आहे. त्यामुळे वित्त आयोगाच्या निधीतून मनपा, नपा मालामाल होणार आहे.

जळगावला ९ कोटी

जळगाव महापालिकेला बंधनकार/मुलभूत अनुदानातून ३ कोटी ७५ लाख ८७ हजार २२० व साठवण घनकचरा व्यवस्थापनासाठी ५ कोटी ६७ लाख ४३ हजार ६०३ असे एकूण ९ कोटी ४३  लाख ३० हजार ८२३ रुपयांचे अनुदान मंजूर झालेले आहे. यापाठोपाठ भुसावळ, अमळनेर नगरपरिषदांनाही एक कोटीच्यावर अनुदान मंजूर झालेले आहे. इतर नगरपालिका, व नगरपंचायत क्षेत्रांना देखील १५ लाखाच्यावर अनुदान मिळणार आहे. या अनुदानातून शासनाने निर्देशित केलेली कामे संबंधित उपाय योजनेच्या विनियोगासाठी करणे बंधनकारक आहे.

Web Title: Jalgaon Municipal Corporation and the municipal goods in the district! Substantial funding from the Finance Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.