महापालिकेची एकाच दिवशी साडे तीन कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली
By सुनील पाटील | Published: February 28, 2023 07:11 PM2023-02-28T19:11:18+5:302023-02-28T19:11:55+5:30
जळगाव महापालिकेने एकाच दिवशी साडे तीन कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली केली.
जळगाव: अभय शास्ती योजनेतंर्गत मंगळवारी मालमत्ता थकबाकीदारांकडून महापालिकेची ३ कोटी ४१ लाख रुपयांची रेकॉर्डब्रेक वसुली झाली आहे. सोमवारी २ कोटी ३१ लाख रुपयांचा भरणा झाला होता. दोन दिवसात ५ कोटी ७२ लाखाची वसुली झाली आहे. दरम्यान, उद्योजकांच्या विनंतीनुसार खास बाब म्हणून आणखी पाच दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेमुळे नागरिकांना ३० ते ६० टक्के पर्यंत फायदा होत आहे. आतापर्यंत १९ कोटी रुपयांची वसूली झाली आहे. गेल्या वर्षी ६० कोटी रुपये वसुल झाले होते. यंदा फेब्रुवारीतच ७२ कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. ३१ मार्चपर्यंत ९१ कोटी रुपये वसुलीचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याची माहिती उपायुक्त गणेश चाटे यांनी दिली.