जळगाव महापालिकेसाठी भाजपाचा विकासाचा मुद्दा ठरला प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 02:10 PM2018-08-04T14:10:29+5:302018-08-04T14:15:07+5:30

मनपा निवडणुकीत भाजपाने संयमी प्रचार करीत विकासाचे आश्वासन दिले. त्यामुळे जळगावकरांनी शिवसेनेला नाकारले व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात प्रथमच हादरा दिला. याविरुद्ध विकासाचे आश्वासन स्विकारुन भाजपाला भरघोस कौल देत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.

Jalgaon Municipal Corporation has become the development point of the BJP | जळगाव महापालिकेसाठी भाजपाचा विकासाचा मुद्दा ठरला प्रभावी

जळगाव महापालिकेसाठी भाजपाचा विकासाचा मुद्दा ठरला प्रभावी

Next
ठळक मुद्देभाजपाचा ऐतिहासिक विजयमहापालिका निवडणुकीत शिवसेनेला धक्काभाजपाने संयमी प्रचार करीत विकासाचे दिले आश्वासन

हितेंद्र काळुंखे ।
जळगाव : मनपा निवडणुकीत भाजपाने संयमी प्रचार करीत विकासाचे आश्वासन दिले. त्यामुळे जळगावकरांनी शिवसेनेला नाकारले व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात प्रथमच हादरा दिला. याविरुद्ध विकासाचे आश्वासन स्विकारुन भाजपाला भरघोस कौल देत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.
सुरेशदादा जैन यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी गमावल्यानंतर ही मनपा निवडणूक त्यांच्यासाठी राजकीय अस्तीत्वाची लढाई होती. तर गिरीश महाजन यांच्या भाजपाच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला झळाळी देणारी होती.
सत्ताधाऱ्यांवरील नाराजीचा फायदा
मनपावर हुडको व इतर कर्जाचा डोंगर असल्याने उत्पन्नातील बहुतांश वाटा हा कर्ज फेडण्यातच जात होता. यामुळे विकास कामांसाठी पैसाच शिल्लक राहत नसल्याने गेल्या अनेक वर्षात विकास कामेच होवू शकली नाही. याचबरोबर मनपातील सत्ताधाºयांवर गैरव्यवहाराचा ठपका बसला. ही कारणे मतदारांमध्ये सत्ताधारी खाविआ (शिवसेना) बद्दल नाराजी निर्माण करणारी ठरली. या नाराज मतदारांना विकासाचे आश्वासन देत आपल्याकडे वळविण्यात भाजपाने यश मिळवले.
...अन्यथा मते मागणार नाही
केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने मनपाला कर्जकमुक्त करु, विकासासाठी २ महिन्यातच २०० कोटी आणू आदी आश्वासने महाजन यांनी मतदारांना दिली. ही आश्वासने १ वर्षात पूर्ण नाही झालीत तर विधानसभेत मत मागणार नाही, असे म्हणत आमदार सुरेश भोळे यांना कसोटीवर लावले होते. हाच मुद्दा मतदारांना अपील करणारा ठरला. फक्त विकास करु असे म्हटले असते तर मतदारांनी कदाचित विश्वास टाकला नसता.
..आता विश्वास सार्थ ठरवावा
नगरपालिका आणि मनपाच्या इतिहासात भाजपाला जळगावकरांनी प्रथमच मनपावर एकहाती सत्ता देवून विश्वास टाकला आहे. यामुळे भाजपाचा हा ऐतिहासिकच विजय ठरतो. विकास करु या आश्वासनावर विश्वास ठेवत मतदारांनी भाजपाला कौल दिला. यामुळे १ वर्षात विकास करुन दाखवू , एकदा संधी देवून बघा.... असे म्हणणारे महाजन यांना मतदारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा लागणार आहे.
आयात उमेदवारांचे मिळाले बळ
भाजपाने मनसे, शिवसेना तसेच राष्ट्रवादीतून अनेक प्रबळ उमेदवार आयात केले. याचाही लाभ भाजपाला झाला. स्वपक्षाच्या १५ पैकी १३ नगरसेवकांना उमेदवारी दिली तर आयात उमेदवारांवर मदार ठेवत खाविआचे ३, राष्ट्रवादीचे ६, मनसेचे महापौर ललित कोल्हे यांच्यासह ६ व १ जनक्रांतीचा अशा एकूण १६ आयात नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाईकांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यांना खेचण्यात भाजपाची राज्यातील ‘सत्ता’ हेच प्रभावी अस्त्र ठरले.

Web Title: Jalgaon Municipal Corporation has become the development point of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.