जळगाव महापालिकेस ३० कोटी विशेष अनुदान मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:27 PM2018-10-07T12:27:50+5:302018-10-07T12:29:00+5:30
गिरीश महाजन यांची माहिती
जळगाव : राज्य शासनाकडून शहराच्या विकासासाठी मंजूर केलेला १०० कोटींचा निधी हा राज्याच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर आहे. यात मनपाकडून ३० कोटी उभारणे अपेक्षित आहे. मात्र मनपाची यासाठी तयारी नसल्याने हा निधी विशेष अनुदान म्हणून देण्यास मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी मनपाने पत्र द्यावे अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असल्याचे गिरीश महाजन यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
शहराचा चेहेरामोहरा बदलवू
शहराचा चेहेरामोहरा बदलवू असा शब्द मी जळगावकरांना दिला आहे. त्यानुसार येत्या वर्षभरात शहरात कामे दिसतील. यात कोणताही बदल नसेल, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
वरखेडे लोंढे, शेळगाव बॅरेजमध्ये जुलैत पाणी थांबणार
जिल्ह्यात महत्वाकांक्षी असलेल्या वरखेडे लोंढे व शेळगाव बॅरेजमध्ये पुढील वर्षी जुलै महिन्यात पाणी थांबणार आहे.
बलून बंधाºयांना राज्यपालांची मान्यता
मेगा रिचार्ज प्रकल्पाचे नुकतेच हवाई सर्वेक्षण झाले. गिरणा नदीवरील सात ठिकाणी बलून बंधारे बांधरे प्रस्तावित आहे. त्यांना राज्यपालांची मान्यता बाकी होती तीदेखील मिळाली. सुमारे ७०० कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. निम्न तापी प्रकल्प केंद्राच्या पंतप्रधान कृषि सिचाई योजनेतून करणे प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी एकरकमी पैसा मिळावा असे प्रयत्न आहेत.
बोदवड उपसा योजनेचे १०० कोटींचे काम आतापर्यंत झाले आहे. भागपूर योजनेचे कामही अंतिम टप्प्यात असून दीड हजार कोटींचा हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाच्या लोकार्पणास मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा लवकरच येतील असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
भुयारी गटारींचा प्रश्न आठवडाभरात मार्गी लागणार
महामार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन महामार्गास समांतर असे रस्ते प्रस्तावित आहेत. यासाठीच्या आराखड्यास मंजूरी मिळाली असून महिनाअखेर या कामांना सुरूवात होईल असे गिरीश महाजन यांनी सांगितले. जळगावात पाणी बचत करावी लागणार. वेळ पडल्यास पाणी पुरवठ्यात तीन दिवसाआड होण्याची शक्यता आहे. भुयारी गटारींच्या कामांचा प्रश्न आठवडाभरात सुटेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम पूर्ण करणार, असेही गिरीश महाजन म्हणाले.