जळगाव मनपाकडून आता रात्रीही राबविली जाईल अतिक्रमण मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 04:16 PM2018-01-15T16:16:41+5:302018-01-15T16:17:20+5:30
शहरात महापालिकेने गेल्या महीन्याभरापासून अतिक्रमण मोहीम हातात घेतली आहे. आता महानगरपालिकेकडून रात्री देखील अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविली जाणार असून, १८ किंवा १९ तारखेपासून या मोहिमेस सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती अतिक्रमण निर्मुलन विभाग अधीक्षक एच.एम.खान यांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१५-शहरात महापालिकेने गेल्या महीन्याभरापासून अतिक्रमण मोहीम हातात घेतली आहे. आता महानगरपालिकेकडून रात्री देखील अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविली जाणार असून, १८ किंवा १९ तारखेपासून या मोहिमेस सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती अतिक्रमण निर्मुलन विभाग अधीक्षक एच.एम.खान यांनी दिली.
महापालिकेने सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान अतिक्रमण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरतील वर्दळीच्या रस्त्यावरील तसेच नो हॉकर्स झोनमधील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव शहरात प्रभावपणे मध्यवर्ती बाजारपेठेत ही मोहीम राबविली जात असून, फुले मार्केट, बळीराम पेठ, सुभाष चौक व शिवाजी रोड या भागातील हॉकर्सवर दररोज महापालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. मात्र रात्रीच्या वेळी देखील शहरातील अनेक भागांमध्ये अतिक्रमणाचा विळखा पडल्याने अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे दिवसा सुरु असलेली मोहिम रात्री देखील राबविण्यात येणार आहे.
२७ पथकांकडून केली जाईल कारवाई
या मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून २७ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मोहिमेत स्वत: अप्पर अ ायुक्त राजेश कानडे देखील सहभागी होणार आहेत. या मोहिमेआधी शहरातील मुख्य रस्त्यांवर दोन दिवस अतिक्रमण विभागाकडून सूचना देण्यात येणार आहे. अनेक स्टॉलधारक किंवा हातगाड्यांवर पदार्थ विक्री करणारे विक्रेते आपल्या हातगाड्या रस्त्यावरच उभे करून जातात. त्यामुळे अशा वाहने अतिक्रमण विभागाकडून नष्ट केली जाणार आहेत.
या भागात होणार कारवाई
शहरातील नवीपेठ, अशोक टॉकीज गल्ली, फुले मार्केट, शहर पोलिस ठाण्याच्या बाजूची गल्ली, नेहरु चौक, खान्देश कॉम्पलेक्स, गोलाणी मार्केट, गांधी मार्केट, बळीराम पेठ या भागात रात्रीची अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार आहे.
स्टेशन परिसरातील २० हॉकर्सचे होणार स्थलांतर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरातील १५० मीटर दरम्यान, नो हॉकर्स झोन निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील २० हॉकर्सचे मनपाककडून स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यांना जनता बँकेच्या मागील गल्लीत जागा देण्यात आली असून, २३ जानेवारीपासून ही प्रक्रीया करण्यात यणार असल्याची माहितीही एच.एम.खान यांनी दिली.