जळगाव मनपा ३९७ खुले भूखंड ताब्यात घेणार, दप्तरी दाखल करारनामे मागवले

By अमित महाबळ | Published: April 29, 2023 05:12 PM2023-04-29T17:12:17+5:302023-04-29T17:12:26+5:30

शहरातील खुले भूखंड वेगवेगळ्या संस्थांच्या ताब्यात असून, त्यांच्याकडून ते परत घेण्यासाठी महापालिका प्रशासनाची नुकतीच बैठक झाली.

Jalgaon Municipal Corporation will take over 397 open plots, the agreement has been filed in the register | जळगाव मनपा ३९७ खुले भूखंड ताब्यात घेणार, दप्तरी दाखल करारनामे मागवले

जळगाव मनपा ३९७ खुले भूखंड ताब्यात घेणार, दप्तरी दाखल करारनामे मागवले

googlenewsNext

जळगाव : शहरातील खुले भूखंड वेगवेगळ्या संस्थांच्या ताब्यात असून, त्यांच्याकडून ते परत घेण्यासाठी महापालिका प्रशासनाची नुकतीच बैठक झाली. कारवाई करण्यापूर्वी करारनाम्यांची तपासणी केली जाणार आहे. त्याची मागणी नगररचना विभागाकडे करण्यात आली आहे.

शहरातील ३९७ खुले भूखंड खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत. त्यांचा नियमबाह्यपणे वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हे भूखंड पुन्हा महापालिकेकडे घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर गठित समितीची नुकतीच बैठक झाली. भूखंड वाटप करताना संस्थांशी करारनामे व ठराव करण्यात आले आहेत. कारवाई करण्यापूर्वी करारनाम्यात नेमके काय म्हटले आहे याची माहिती उपायुक्त गणेश चाटे यांनी मागवली आहे. ही कागदपत्रे नगररचना विभागात आहेत. ती सादर करावीत, असे या विभागाला कळविण्यात आले आहे. 

दरम्यान, बेसमेंटमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे या प्रकरणात देखील कारवाई प्रस्तावित आहे. नगररचना विभाग प्रत्येक प्रकरणाची सुनावणी घेऊन त्यानंतर एकत्रित कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Jalgaon Municipal Corporation will take over 397 open plots, the agreement has been filed in the register

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.