जळगाव महापालिकेचे कोविड केअर सेंटर अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:10 AM2021-02-22T04:10:06+5:302021-02-22T04:10:06+5:30
जळगाव : जिल्ह्यात विशेषत: जळगाव शहरात कोरोनाचे रुग्णवाढत असल्याने लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेचे कोविड ...
जळगाव : जिल्ह्यात विशेषत: जळगाव शहरात कोरोनाचे रुग्णवाढत असल्याने लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेचे कोविड केअर सेंटर अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी स्वच्छतेचे काम सुरू होते.
या ठिकाणी २४० रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल. रुग्ण आणखी वाढल्यास शासकीय आयटीआयच्या इमारतीतही व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली आहे. मध्यंतरी रुग्ण कमी झाल्याने मनुष्यबळाच्या कमतरतेने हे सेंटर बंद करून रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी अडचणी सुरू झाल्याने या रुग्णांना इकरा वैद्यकीय महाविद्यालयात हलविले होते. मात्र, रुग्णांची संख्या गेल्या आठवडाभरापासून वाढल्याने अखेर हे सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.