जळगाव मनपा निवडणूक : १४ महिलांसह २० जण हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:56 PM2018-07-22T12:56:14+5:302018-07-22T12:56:57+5:30
प्रातांधिकाऱ्यांची कारवाई
जळगाव : निवडणुकीच्या काळात सार्वजनिक उपद्रव निर्माण करणाºयांना पोलीस व महसूल प्रशासनाकडून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दुसºया टप्प्यात तात्पुरत्या स्वरुपात रामानंद नगर व शनीपेठ हद्दीतील २० जणांना दहा दिवसांसाठी हद्दपार केले आहे. त्यात १४ महिलांचा समावेश आहे.
महापालिका निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी तसेच निर्भयपूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपद्रवी ठरणाºयांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. रामानंद नगर व शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील २० जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार तात्पुरती हद्दपारीचा प्रस्ताव प्रातांधिकाºयांकडे पाठविला होता. प्रातांधिकारी जितेंद्र पाटील यांनी पोलिसांकडून आलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून १८ रोजी त्याला मंजुरी दिली. त्यानुसार या २० जणांना २५ जुलै ते ५ आॅगस्ट या दरम्यान जळगाव बाहेर रहावे लागणार आहे.
यांच्यावर केली हद्दपारीची कारवाई
शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील खटाबाई सुरेश सपकाळे, भरत लुकडू मराठे, कौशल्या मधुकर नन्नवरे, रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील पौर्णिमाबाई प्रल्हाद निकम, धन्नो यशवंत नेतलेकर, माधव शामराव निकम, छायाबाई रमेश सकट, भिकुबाई झगडू भोई, अंजनाबाई देवचंद सोनवणे, उत्तम शहादू बाविस्कर, अनिता दिलीप माचरे, विश्वास अरुण गारूंगे, महेंद्र सुरेश बिºहाडे, पार्वताबाई प्रल्हाद सोनवणे, सरलाबाई भावडू सोनवणे, कलाबाई शिवलाल लोंढे, दादा बाळू कोळी, राधाबाई जगन पवार, कलाबाई बाजीराव गुंजे, सुरेखाबाई यशवंत भालेराव यांचा समावेश आहे.