जळगाव मनपा निवडणूक : मुंबई, पुण्यातील मतदारांसाठी उमेदवारांकडून आराम बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:56 PM2018-07-29T12:56:08+5:302018-07-29T12:57:09+5:30
मते आपल्या पारडण्यात पडण्यासाठी धडपड
अजय पाटील
जळगाव : मनपा निवडणुकीत भाजपा व शिवसेनेमध्ये मोठी चुरस आहे. १२ ठिकाणी भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत असून अनेक ठिकाणी तिरंगी लढत रंगणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारासाठी एक-एक मत महत्वाचे ठरणार आहे. १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मतदानासाठी जे मतदार मुंबई, पुण्याला स्थायिक आहेत. त्यांच्यासाठी उमेदवारांनी आतापासूनच खाजगी आराम बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहरातील सुमारे १० हजारहून अधिक मतदार हे मुंबई, पुणे येथे सध्या स्थायिक आहेत. या मतदारांनी मनपा निवडणुकीसाठी मतदान करावे यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रभागातील अशा मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून अशा मतदारांशी मोबाईलव्दारे संपर्क साधला जात असून, त्यांच्या सोईने येण्या-जाण्याची व्यवस्था करुन दिली जात आहेत.
मतदानाची टक्केवारी वाढणार
बाहेरच्या शहरांमध्ये राहत असलेल्या १० हजारहून अधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावला तर याचा फायदा उमेदवारांना जरी होणार असला तरी यामुळे मतदानाचा टक्का देखील वाढणार आहे. मात्र उमेदवारांकडून वाहनांवर होणाºया खर्चाकडे निवडणूक खर्च विभागाचे लक्ष आहे.
३१ जुलैला सकाळी व रात्री येण्याची व्यवस्था
१ आॅगस्टला मतदान असल्याने मुंबई व पुण्याहून सकाळी व सायंकाळी खाजगी आराम बसेस जळगावकडे येणार आहेत. त्यानंतर १ आॅगस्टला ज्या मतदारांना मतदान करून रवाना व्हायचे आहे. त्यांच्यासाठी देखील खाजगी आराम बसेस बुकींग करण्यात आली आहे. ज्या मतदारांना काही दिवस शहरात थांबायचे अशा मतदारांना प्रवासाचे भाडे दिले जाणार आहे. मुंबई, पुणे व्यतिरीक्त सूरत, नाशिक किं वा इतर शहरात राहणाºया मतदारांशी संपर्क साधून त्यांना रेल्वेचे तिकीट काढून दिले जात आहे. तर जवळपासच्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये राहणाºया मतदारांना मतदानाच्या दिवशी आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे.