जळगाव मनपा निवडणूक : विकासाच्या नावावर भ्रष्टाचार - दिलीप कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:13 PM2018-07-27T13:13:42+5:302018-07-27T13:14:59+5:30
शासनाचा निधी सत्ताधाऱ्यांच्या घरात
जळगाव : शहराच्या विकासाचा आराखडा तयार करून विकास करणे अपेक्षित असताना महापालिकेतील सत्ताधाºयांनी विकासाच्या नावावर भष्ट्राचार केला. शासनाकडून आलेल्या निधीतून सत्ताधाºयांनी केवळ आपली घरे भरल्याचा आरोप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री दिलीप कांबळे यांनी महाबळमधील जाहीर सभेत केला.
गुरुवारी रात्री प्रभाग १२ मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, सुरतच्या आमदार संगीता पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार उन्मेष पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, जि.प.चे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्यासह भाजपाचे उमेदवार उपस्थित होते.
घरकुल, व्यापारी संकुल योजनेत गैरव्यवहार
सत्ताधाºयांनी जळगाव शहराचा विकास आराखडा तयार करून विकास करणे गरजेचे होते. मात्र घरकुल योजना व व्यापारी संकुलाच्या कामातून केवळ भष्ट्राचार झाला. आलेल्या निधीतून सत्ताधाºयांनी केवळ आपले घरे भरण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार उन्मेष पाटील यांनी व्यक्ती पाहून मतदान करण्यापेक्षा पक्ष पाहून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार संगीता पाटील यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी भाजपाला संधी देण्याचे आवाहन केले. सुरत महानगरपालिकेचे ५ हजार ६०० कोटी रुपयांचे बजेट आहे. त्या तुलनेत जळगावातील रस्त्यांची मात्र दुरवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. खासदार ए.टी.पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
पावसाला सुरुवात आणि पटांगण खाली
सुरतच्या आमदार संगीता पाटील यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळेत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही काळ गोंधळ होऊन खुर्च्या रिकामा झाल्या.
दिलीप कांबळे यांची गणेश कॉलनी चौकातही सभा झाली.
सत्ताधाºयांच्या आडमुठ्या धोरणाने निधी खर्च झाला नाही
आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेची जबाबदारी नेमकी काय? असा प्रश्न उपस्थित केला. सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारच्या नावाने ओरडत असताना अमृत योजना, भुयारी गटार योजना व घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी कुणी दिला असे सांगितले. जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटींचा निधी दिला. मात्र सत्ताधाºयांच्या आडमुठ्या धोरणामुळे हा निधी खर्च झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव हे मोठ खेड...
कांबळे म्हणाले की, आमदारांनी शहरासाठी शासनाकडून निधी आणला तरीही तो निधी खर्च करण्यासाठी मनपाकडे जातो. त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही, की निधी आणूनही विकास होत नाही. मनपाने शहर विकास आराखडा करून शासनाकडून निधी आणून विकास करायला हवा होता. मात्र जळगाव हे आज मोठ खेड असल्याचे जाणवते, अशी टीका त्यांनी केली.
मनपाने दलित वस्तीचा निधी वळविल्याची होणार चौकशी
शासनाने दलित वस्तीच्या विकासासाठी दिलेला निधी मनपाने अन्यत्र खर्च केला असून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिलीप कांबळे यांनी दिली. सकाळी समतानगर परिसरात रॅलीला गेलो असताना त्या भागात रस्त्यांचा अभाव असल्याचे व चिखल असल्याचे, गटारी उघड्या असल्याचे दिसून आले. याबाबत महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे व नागरिकांकडून माहिती घेतली असता दलित वस्ती सुधारणेसाठी राज्य शासनाकडून दिला जाणारा निधी रस्त्यासाठी न वापरता अन्यत्र वळविण्यात आला. वास्तविक दलित वस्तीचा निधी त्याच वस्तीच्या विकासासाठी वापरणे बंधनकारक आहे. एवढे वर्ष शासनाकडून हा निधी मिळत असतानाही या वस्त्यांमध्ये अशी बिकट परिस्थिती दिसून आली.