जळगाव महापालिका निवडणूक : पावसाळी अधिवेशन संपल्याने आता धडाडणार प्रचाराच्या तोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:15 PM2018-07-24T13:15:22+5:302018-07-24T13:16:20+5:30

प्रदेश नेतेही उतरणार मैदानात

Jalgaon municipal election: With the end of the monsoon session, now the campaigning will end | जळगाव महापालिका निवडणूक : पावसाळी अधिवेशन संपल्याने आता धडाडणार प्रचाराच्या तोफा

जळगाव महापालिका निवडणूक : पावसाळी अधिवेशन संपल्याने आता धडाडणार प्रचाराच्या तोफा

Next
ठळक मुद्दे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांच्या सभांचे नियोजनसभा व प्रचार रॅलीत सहभागी होणार

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी अवघे ८ दिवस शिल्लक आहेत.माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या व्यतिरिक्त इतर मोठे नेते प्रचार रॅलींमध्ये उतरलेले दिसून येत नाही. दरम्यान, विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यामुळे आता खऱ्या अर्थाने महापालिकेच्या प्रचाराला वेग येणार असून राज्यातील दिग्गज नेत्यांच्या तोफा आता धडाडणार आहेत.
विधानसभेचे अधिवेशन संपल्यामुळे सर्वच पक्षातील राज्यपातळीवरचे नेते देखील आता मनपा निवडणुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवसेनेने आधीच आपल्या २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, भाजपा, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील महापालिकेत सभा व प्रचार रॅलीत सहभागी होणार आहेत.
शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, डॉ.अमोल कोल्हे, नितीन बानगुडे-पाटलांच्या सभेचे नियोजन
शिवसेनेतर्फेयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, डॉ.अमोल कोल्हे, आदेश बांदेकर, नितीन बानगुडे-पाटील यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली. त्यांच्यासह सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील हे देखील आता मनपा निवडणुकीसाठी शहरातच तळ ठोकणार असून, तेही काही भागात जाहीर सभा घेणार आहेत. तर हभप ज्ञानेश्वर महाराज हे देखील सभा घेणार आहेत. त्यांच्यासह माजी मंत्री सुरेशदादा जैन हे देखील प्रचारात स्वत: उतरल्यामुळे शिवसैनिकांचा उत्साह वाढला आहे.
एकनाथराव खडसेंच्या आगमनाची प्रतीक्षा
विधानसभेचे अधिवेशन व मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक आता संपल्यामुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे मंगळवारपासून महापालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारात उतरणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. भाजपा कार्यकर्त्यांना देखील त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलपसंपदा गिरीश महाजन, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभा देखील होणार आहेत.
मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी प्रयत्न
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेसाठी प्रयत्न सुरु असून, भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे नियोजन देखील करण्यात येतआहे. अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
कॉँग्रेस, राष्टÑवादीकडूनही सभांचे नियोजन
कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसकडून देखील राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरु असून, माजी मुख्यमंत्री तथा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार भाई जगताप यांच्यासह काही नेत्यांच्या सभांसाठी कॉँग्रेस प्रयत्नशील आहे. तर राष्टÑवादीकाँग्रेसचे नेते,माजीउपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे हे नेते देखील महापालिकेच्या रणधुमाळीत उतरणार आहेत.

Web Title: Jalgaon municipal election: With the end of the monsoon session, now the campaigning will end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.