जळगाव मनपा निवडणूक : ३६७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:18 PM2018-07-24T13:18:02+5:302018-07-24T13:18:43+5:30

४४ गुन्हेगार हद्दपार

Jalgaon Municipal Election: Prevention of 367 People | जळगाव मनपा निवडणूक : ३६७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

जळगाव मनपा निवडणूक : ३६७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे५२ प्रस्तावावर चौकशी सुरुरात्र व दिवसाची गस्तही वाढविली

जळगाव : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरातील ३६७ जणांवर विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे तर १४४ (२) अन्वये निवडणूक काळासाठी ४४ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. नियमित हद्दपारीचे शहरातून ५६ प्रस्ताव होते. त्यातील ४ जणांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे, तर ५२ जणांच्या प्रस्तावावर चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रात्र व दिवसाची गस्तही वाढविली
महापालिकेसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार, ज्यांच्यापासून परिसरात धोका निर्माण होऊ शकतो अशा लोकांवर कारवाईची मोहीम पोलिसांनी उघडली आहे. तसेच शहरात वाढीव बंदोबस्त लावला आहे.
प्रत्येक पोलीस स्टेशनला ३अतिरिक्त वाहने
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला तीन वाहने अतिरिक्त दिलेली आहेत. या प्रत्येक वाहनात एक अधिकारी व काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांना सतत नेमून दिलेल्या भागात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रात्री संशयास्पद वाहनांची तपासणी
रात्री दहा वाजेनंतर आस्थापना सुरु राहणार नाहीत, याबाबत आधीच सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे हॉटेल, ढाबा व अन्य आस्थापना सुरु आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. महामार्ग तसेच शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर तात्पुरत्या चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. संशयास्पद वाहने व व्यक्तींची तपासणी केली जात आहे.संभाव्य बंदोबस्ताचीही तयारी झालेली आहे. २८ जुलैपासून बंदोबस्त व गस्त आणखीन वाढविली जाणार असल्याचे कराळे यांनी सांगितले. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी निवडणुकीसाठी बाहेर जिल्ह्यातून बंदोबस्त मंजूर केला आहे.

Web Title: Jalgaon Municipal Election: Prevention of 367 People

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.