जळगाव महापालिका निवडणूक : आचारसंहिता कक्षाकडे पैसे वाटपाच्या तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:01 PM2018-08-01T18:01:47+5:302018-08-01T18:06:18+5:30
आचारसंहिता कक्षाकडे सकाळी ७.३० वाजता मतदानास प्रारंभ झाल्यापासून दुपारी सव्वा वाजेपर्यंत पैसे वाटप होत असल्याबाबत विविध भागातून तब्बल ५० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
जळगाव : आचारसंहिता कक्षाकडे सकाळी ७.३० वाजता मतदानास प्रारंभ झाल्यापासून दुपारी सव्वा वाजेपर्यंत पैसे वाटप होत असल्याबाबत विविध भागातून तब्बल ५० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
मनपा निवडणुकीसाठी प्रभागनिहाय १९ पथके व ३ भरारी पथके त्याशिवाय पोलिसांची स्वतंत्र पथके असल्याने तक्रार मिळताच काही मिनीटातच कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल होऊन चौकशी करीत होते. मात्र केवळ समतानगर परिसरात हनुमान मंदिराजवळ पैसे वाटपासाठी आलेली कार पकडल्याच्या वृत्तात तथ्य आढळून आले. संबंधीत लोक वाहन लॉक करून पळून गेल्याचे आढळून आल्याने ते वाहन पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथे पंचनामा करून ते वाहन उघडून आत किती रक्कम आहे? त्याची तपासणी करण्यात आली.