जळगाव महापालिका निवडणुकीत ४९ जागांवर १४५ महिलांची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 03:21 PM2018-07-21T15:21:45+5:302018-07-21T15:26:09+5:30

मनपा निवडणुकीत ७५ पैकी ३८ जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला सदस्यांची संख्या पुरूष सदस्यांपेक्षा जास्त राहणार असतानाच महिला राखीव नसलेल्या जागांवरही महिलांनी उमेदवारी केली आहे. तब्बल ४९ जागांवर १४५ महिला उमेदवार रिंगणात आहेत. महापौरपद याआधीच इतर मागासवर्ग संवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने मनपामध्ये ‘महिलाराज’ कायम राहणार आहे.

In the Jalgaon municipal elections, 145 female candidates are in the 49 seats | जळगाव महापालिका निवडणुकीत ४९ जागांवर १४५ महिलांची उमेदवारी

जळगाव महापालिका निवडणुकीत ४९ जागांवर १४५ महिलांची उमेदवारी

Next
ठळक मुद्देप्रत्यक्षात ७५ पैकी ३८ जागा महिलांसाठीजळगाव महापालिकेत कायम राहणार ‘महिलाराज’३८ जागांवर म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण

जळगाव : मनपा निवडणुकीत ७५ पैकी ३८ जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला सदस्यांची संख्या पुरूष सदस्यांपेक्षा जास्त राहणार असतानाच महिला राखीव नसलेल्या जागांवरही महिलांनी उमेदवारी केली आहे. तब्बल ४९ जागांवर १४५ महिला उमेदवार रिंगणात आहेत. महापौरपद याआधीच इतर मागासवर्ग संवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने मनपामध्ये ‘महिलाराज’ कायम राहणार आहे.
शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणाला मंजुरी दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील चित्र बदलले आहे. पूर्वी पुरूष मंडळींच्या या राजकारणात असलेल्या वर्चस्वाला या निर्णयाने सुरूंग लागला आहे. सध्या पुरूष मंडळीच घरातील महिला सदस्याच्या नावाने राजकारण करीत असली तरीही कालांतराने यातही बदल होणार हे निश्चित आहे.
१९ प्रभागांमधील ७५ जागांपैकी अनुसुचीत जमाती प्रवर्गाच्या ५ जागांसाठी ३ महिला राखीव व २ पुरुष जागांसाठी, अनुसूचित जमातींकरीता आरक्षित असलेल्या ४ जागांमधून २ महिलांकरिता, मागास प्रवर्ग २० जागांमधून १० महिला राखीव तर सर्वसाधारण ४६ जागांमधून २३ महिला राखीवची सोडत काढण्यात आली आहे. म्हणजेच ७५ पैकी ३८ जागा महिला राखीव असून पुरूषांसाठी फक्त ३७ जागा आहेत.

Web Title: In the Jalgaon municipal elections, 145 female candidates are in the 49 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.