जळगाव मनपा निवडणूक : आम आदमी पार्टीलाही लाथाड्यांची ‘लागण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:46 PM2018-07-22T12:46:42+5:302018-07-22T12:48:12+5:30

महागराध्यक्षांवरील कारवाईवर प्रश्नचिन्ह

Jalgaon municipal elections: Aam Aadmi Party's 'lagans' | जळगाव मनपा निवडणूक : आम आदमी पार्टीलाही लाथाड्यांची ‘लागण’

जळगाव मनपा निवडणूक : आम आदमी पार्टीलाही लाथाड्यांची ‘लागण’

Next
ठळक मुद्देवादकारवाई खरी की खोटी यावर प्रश्नचिन्ह

जळगाव : एखादा पक्ष मोठा झाला की, त्यात गटबाजी, एकमेकांना लाथाड्या मारणे असे प्रकार सुरु होतात मात्र जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही फारसे अस्तीत्व नसलेल्या आम आदमी पक्षाला जिल्ह्यात ही लागण लगेचच झाली आहे.
‘आप’चे महानगराध्यक्ष ईश्वर मोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा ठराव बुधवारी एका प्रदेश पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आला. मात्र दुसºयाच दिवशी मोरे यांनी दुसºया एका प्रदेश पदाधिकाºयाचा दाखला देत ही कारवाई चुकीची असून हे वृत्त देणाºया पक्षाच्या पदाधिकाºयांवर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले. यामुळे ही कारवाई खरी की खोटी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान ही बाब लवकरच स्पष्ट होईलही परंतू अजून पक्षाचा शहरात आणि जिल्ह्यात विस्तार झाला नाही तोच अशा प्रकारे अंतर्गत वाद उफाळून आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
महागरपालिका निवडणुकीत पक्षातर्फे काही उमेदवार देण्याची तयारी करण्यात आली होती मात्र राज्यात निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणीच नसल्याने पक्षाचे ‘झाडू’ हे चिन्ह मिळण्यास अडचण येत होती. यामुळे उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर काहींनी कोणास समर्थन द्यावे, असा विचार पुढे आणला... यावरुन मतदभेद झाल्याने मोरे यांच्याविरुद्ध डॉ. सुनील गाजरे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्याचे दिसून येते.
दरम्यान ईश्वर मोरे यांच्यावर पक्षविरोधी निर्णय घेत असल्याचा आरोपही केला गेला असून मोरे आणि इतर अशी जुगलबंदी सध्या ‘आप’ मध्ये सुरु आहे.

Web Title: Jalgaon municipal elections: Aam Aadmi Party's 'lagans'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.