जळगाव महापालिका निवडणूक : एकनाथराव खडसे गटाचे इच्छूक नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:56 PM2018-07-11T12:56:02+5:302018-07-11T12:57:23+5:30
निष्ठावंतांना डावलले
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी भाजपाकडून मंगळवारी ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, यामध्ये अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे नाराजी आहे. काल-परवा इतर पक्षातील आयात केलेल्या उमेदवारांना पक्षाकडून तिकीट दिले जात असून, खडसे समर्थकांपैकी केवळ ४ जणांना संधी दिल्याचे समजते. या प्रकारामुळे भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.
भाजपामध्ये सध्या इतर पक्षातील नगरसेवकांचे ‘इनकमींग’ वाढले आहे. गेल्या चार दिवसाच्या राजकीय घडामोडींमध्ये मनसे, खाविआ, राष्टÑवादीचे तब्बल १८ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये महापौरांचाही समावेश आहे. त्यामुळे या सर्व आयात उमेदवारांना भाजपाकडून उमेदवारी देण्यावर भर दिला जात आहे.
मात्र, यांचा विचार करताना अनेक वर्षे भाजपाचे झेंडे हातात घेवून आंदोलने करणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाºयावर सोडून दिल्यामुळे भाजपा कार्यालयात नाराज पदाधिकाºयांची गर्दी झाली होती.
सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी
ऐनवेळी उमेदवारी रद्द झाल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. निरंजन शेलार यांनी आपल्या फेसबूक पेज वर नाराजी व्यक्त करत, महापौरांचा रुपाने मोठा मासा गळाला लागल्याने सामान्य कार्यकर्त्यांना डावलले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच काही विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापल्याची चर्चा दिवसभर होती. तर नाराज पदाधिकारी इतर पक्षांकडून निवडणूक लढविण्याबाबतचे संदेश देखील दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते.
तिकीट न मिळालेले भाजपा कार्यालयात
मनपा निवडणुकीसाठीच्या भाजपाच्या सर्व हालचाली या भाजपा कार्यालयाऐवजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयातून सुरु आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी व नेत्यांची गर्दी ही संपर्क कार्यालयातच होत आहे. मंगळवारी भाजपाकडून संभाव्य ७५ उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्यामुळे सकाळी १० वाजेपासून इच्छुकांनी गर्दी केली होती. मात्र, दुपारनंतर काही उमेदवारांचा पत्ता कट केल्याने अनेक पदाधिकाºयांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळाली. तर काही पदाधिकाºयांना आपले अश्रू अनावर झाले. ज्यांची उमेदवारी निश्चित झाली तेच उमेदवार संपर्क कार्यालयात थांबून होते. तर नाराज पदाधिकाºयांनी भाजपा कार्यालयात गर्दी केली होती.