जळगावात मनपा निवडणुकीसाठी भाजपा समविचारी पक्षांशी युती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 08:57 PM2018-06-16T20:57:26+5:302018-06-16T20:57:26+5:30
मनपा निवडणुकीत समविचारी पक्ष किंवा व्यक्तींसोबत युती करण्याची भाजपाची तयारी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांंनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. या निवडणुकीच्या नेतृत्त्वाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
जळगाव : मनपा निवडणुकीत समविचारी पक्ष किंवा व्यक्तींसोबत युती करण्याची भाजपाची तयारी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांंनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. या निवडणुकीच्या नेतृत्त्वाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आयोजित मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी पालकमंत्री हे जळगावात आले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
निवडणुकीची जबाबदारी खडसे, महाजन व भोळेंवर
मनपा निवडणुकीचे नेतृत्व कोण करणार? या प्रश्नावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, या निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्यावर संयुक्तरित्या सोपवली असून या कोअर कमेटीस जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, आमदार, चंदूलाल पटेल हे मदत करतील. नेतृत्व कोणी करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.