जळगाव मनपा निवडणूक : काँग्रेसच्या उमेदवारावर पोलिसात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:04 PM2018-07-25T13:04:36+5:302018-07-25T13:04:53+5:30
मालमत्तेचे केले विद्रुपीकरण
जळगाव- पक्षाचे झेंडे तसेच पोस्टर लाऊन शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सय्यद फारूख सैय्यद गफ्फार (रा़ शाहुनगर) यांच्याविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे़
मनपा निवडणुकीसाठी १ आॅगस्टला मतदान होणार आहे़ यासाठी सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे़ काँग्रेस पक्षाचे उमदेवार सय्यद फारूख सैय्यद गफ्फार यांनी शाहुनगरातील मनपाच्या शौचालयावर पक्षाचे झेंडे तसेच पोस्टर लावून शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केले़ हा प्रकार मनपा प्रशासनाच्या लक्षात आला़ अखेर सायंकाळी मनपा कारकून बुडन खान सरदार खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद फारूख यांच्या विरूध्द महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम १९९५ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत कोसे करीत आहेत़