जळगावात मनपा निवडणुकीत तीन नगरसेवकांचा पत्ता भाजपाकडून कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:12 PM2018-07-12T13:12:58+5:302018-07-12T13:14:13+5:30

सर्व जागांवर उमेदवार

In Jalgaon municipal elections, cut by the BJP from the address of three corporators | जळगावात मनपा निवडणुकीत तीन नगरसेवकांचा पत्ता भाजपाकडून कट

जळगावात मनपा निवडणुकीत तीन नगरसेवकांचा पत्ता भाजपाकडून कट

googlenewsNext
ठळक मुद्देआयात १८ पैकी १६ नगरसेवकांना उमेदवारीवामनराव खडके यांच्या ऐवजी पुत्र लढणार

जळगाव : मनपा निवडणुकीत युतीबाबत अखेरपर्यंत कोणताही निर्णय न झाल्याने भाजपाने सर्व ७५ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यात स्वपक्षाच्या १५ पैकी १२ नगरसेवकांचा समावेश असून यातून पृथ्वीराज सोनवणे, जयश्री नितीन पाटील व मायादेवी गेही या तिघांना वगळले आहे. दरम्यान आयात केलेल्या १८ नगरसेवकांपैकी केवळ विजय कोल्हे आणि खुशबू बनसोडे या दोघांना सोडून सर्वांना किंवा नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विजय कोल्हे यावेळी रिंगणाबाहेर
मनसचे महापौर ललित कोल्हे आणि नगरसेवक विजय कोल्हे, सिंधुताई कोल्हे, पार्वताबाई भिल, संतोष पाटील, पद्मा सोनवणे व खुशबू बनसोडे अशा आठ जणांंनी भाजपात प्रवेश घेतला. यापैकी विजय कोल्हे हे निवडणूक लढवणार नसून खुशबू बनसोडे या देखील रिंगणात नाही. ८ पैकी ६ जणांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
खाविआचे तिघे भाजपाकडून रिंगणात
खाविआचे नगरसेवक सदाशिव ढेकळे, भारती कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी या तिघांनाही भाजपाने उमेदवारी दिली आहे. तसेच जनक्रांतीचे नगरसेवक सुुनील पाटील यांच्या मातोश्री रेखा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अपक्ष नवनाथ दारकुंडे हे देखील भाजपाकडून निवडणूक लढवत आहे.
सर्वाधिक आयात उमेदवारांनाच दिली भाजपाने संधी
भाजपाने गेल्या वेळी ७५ पैकी ७० जागांवर उमेदवार उभे केले होते. यंदा सर्व ७५ जागांवर उमेदवार दिले असून यात स्वपक्षाचे १२ तर अन्य पक्षातून आयात केलेले १६ अशा नगरसेवकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे.
वामनराव खडके यांच्या ऐवजी पुत्र लढणार
मनपातील विरोधी पक्ष नेते वामनराव खडके हे यंदा निवडणूक लढवणार नसून त्यांच्या ऐवजी भाजपाने यंदा त्यांचे पुत्र सुनील खडके यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
युतीचा निर्णय वरिष्ठांचा - सुरेश भोळे
युतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरील असून युतीचा अंतीम निर्णय होवू न शकल्याने आम्ही सर्व ७५ जागांवर उमेदवार दिले आहेत, अशी माहिती आमदार तथा भाजपाचे महानगराध्यक्ष सुरेश भोळे यांनी दिली.
कापसे यांच्या घरात दोघांना उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ६ नगरसेवकांमध्ये सुरेश माणिक सोनवणे, तर कंचन सनतक यांचे पती चेतन सनकत यांना उमेदवारी दिली. प्रतीभा कापसे यांना स्वत:सह मुलगा मयूर कापसे अशा एकाच घरातील दोघांना उमेदवारी दिली असून शोभा दिनकर बारी, गायत्री उत्तम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच राष्ट्रवादीच्याच नगरसेविका शालिनी काळे यांच्या स्नुषा रेश्मा काळे यांना उमेदवारी देण्यात आली.

Web Title: In Jalgaon municipal elections, cut by the BJP from the address of three corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.