जळगाव मनपा निवडणूक : स्टार प्रचारकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:53 PM2018-07-31T12:53:02+5:302018-07-31T13:03:04+5:30
शिवतीर्थ मैदान व सागर पार्क सुनेसुने
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. १२ दिवस प्रचाराच्या तोफा धडाडल्या. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. मात्र अनेक राजकीय पक्षांचे स्टार प्रचारकांनी जळगावकडे पाठ फिरविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. तर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक स्टार प्रचार जळगावात फिरकलेच नाही. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, आमदार इम्तियाज जलिल, वारीस पठाण, माजी मंत्री सुरेशदादा जैन, एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री दादा भुसे, दिलीप कांबळे, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांच्या यांच्या सभा झाल्या.
सागर पार्क, शिवतीर्थ मैदानावर एकही सभा झाली नाही. चौकाचौकात नेत्यांनी सभा घेतल्या.
भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आलेच नाही
भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार होते मात्र २९ रोजीचा त्यांचा दौरा रद्द झाला. यानंतरही शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री येण्याबाबत शक्यता वर्तविली जात होती. मात्र ते अखेरीस आले नाही. भाजपाचे कोणीही स्टार प्रचारक जळगावात फिरकले नाही. दरम्यान जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांंनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसहच प्रचाराची धुरा अधिक प्रमाणात सांभाळली. २९ रोजी सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. जय्यत तयारीही झाली होती. मात्र मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना या उद्रेकाचा सामना करावा लागू नये यासाठी हा दौरा रद्द झाल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याही सभेचे नियोजन पक्षाने केले होते परंतु ते काही कारणास्तव येवू नियोजित दिवशी येवू शकले नाही. दुसºया दिवशी ते आले मात्र जाहीरनामा प्रकाशित करुन तसेच पत्रपरिषद घेवून लगेचच माघारी परतले.
स्टार प्रचारक फिरकलेच नाही
माज मंत्री एकनाथराव खडसे हे मात्र स्वत: हून प्रचारात सहभागी झाले. पक्षाने न बोलवतानाही आपण आल्याच ते म्हणाले. तीन दिवस वेळ देत त्यांनी भेटींवर अधिक भर दिला. याचबरोबर व्यापारी व काही संघटनांची बैठकही घेतली. काही जाहीर सभाही घेतल्या. बाहेरुन केवळ प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे आणि खासदार अमर साबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, गुजरातच्या आमदार संगीता पाटील हे येवून गेले. भाजपाचे स्टार प्रचारक मात्र फिरकलेच नाही.
पालकमंत्र्यांची एकही सभा नाही
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडणुकी दरम्यान एकदाच जळगावात आले. यादरम्यान त्यांनी शहरातील काही मान्यवर, सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्या त्यांच्या घरी जावून भेटीगाठी घेण्यावर भर दिला. भाजपाच्या उमेदवारांशी संवाद साधला होता. त्यानंतर ते २६ व २७ रोजी जळगावात येणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. त्यांची एकही जाहीर सभा झाली नाही.
शिवसेनेकडून सुरेशदादांसह तीन मंत्री, ४ आमदारांनी सांभाळली प्रचाराची धुरा
खान्देश विकास आघाडी ऐवजी यावेळी शिवसेनेच्या चिन्हावर मनपा निवडणूक लढविली जात आहे. त्यातच शिवसेना विरुध्द भाजप अशी थेट लढत होत आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह राज्यपातळीवरील नेत्यांच्या तोफा देखील मनपाच्या रणसंग्रमात शिवसेनेकडून धडाडल्या. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह तीन मंत्री व शिवसेनेच्या चार आमदारांनी प्रचार केला.
प्रचारात शिवसेनेकडून पहिल्या दिवसांपासून कोणत्याही पक्षावर टीका न करता शहराच्या विकासासाठी भविष्यात काय करता येईल यावरच भर देण्यात आला. प्रसंगी विरोधकांकडून टीका झाल्यानंतर त्या टीकेला देखील शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले. हीच प्रचाराची रणनिती शिवसेनेची दिसून आली. राज्यपातळीवरुन देखील आदेश बांदेकर यांनी प्रचार रॅली व सभा घेतली. तर पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार निलम गोºहे, आमदार हाजी अरफात यांनी देखील शहरात सभा घेवून मनपाचे मैदान गाजविले. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभांची देखील तयारी सेनेकडून करण्यात आली. मात्र, काही कारणास्तव त्यांचा सभा होवू शकल्या नाहीत.
संपर्क प्रमुखांसह आजी-माजी आमदार तळ ठोकून
शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत पहिल्या दिवसांपासून शहरातच तळ ठोकून होते. शहरातील पदाधिकाºयांची बैठक घेवून त्यांना सूचना देणे असो वा प्रचार रॅली, सभेमध्ये देखील त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील व जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ हे देखील शहरातच तळ ठोकून होते.
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी प्रचाराची धुरा आपल्याच खांद्यावर घेवून शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवारासाठी प्रचार रॅली व सभा त्यांनी घेतल्या. तसेच सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील हे देखील आधिवेशन संपल्यानंतर शहरातच थांबून होते. त्यांनी देखील पाच सभा शहरात घेतल्या. तसेच हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी देखील काही सभा घेतल्या.
नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, देवकरांच्या झाल्या सभा
मनपा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडालेला असताना राष्टÑवादीच्या जिल्हा नेत्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळली. राज्यस्तरीय नेत्यांनी मात्र जळगावकडे आधी होकार देऊनही ऐनवेळी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोमाने प्रचार केला. राष्टÑवादीकडून स्टार प्रचारकांच्या सभांची मागणी प्रदेश कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींच्या सभांची मागणी केली होती. त्यापैकी चित्रा वाघ, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड वगळता इतर नेत्यांनी जळगावात हजेरी लावली नाही. चित्रा वाघ यांनी दोन दिवस जळगावात थांबून विविध प्रभागांमध्ये कॉर्नर सभा तसेच प्रचार रॅलीत सहभाग घेतला. तर नवाब मलिक यांनीही दोन सभा घेतल्या. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे तर जिल्ह्याचे निरीक्षक आहेत. मात्र त्यांनी जळगावात एकही सभा घेतली नाही. त्यामुळे स्थानिक जिल्हा नेत्यांवर व उमेदवारांवरच प्रचाराची धुरा आली.
देवकरांनी सांभाळली धुरा... जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे जळगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवकही राहिलेले असल्याने त्यांना मनपाच्या राजकारणाची तसेच शहराची चांगली माहिती असल्याने त्यांच्यावर नियोजनाची प्रमुख जबाबदारी होती. त्यांच्यासोबत अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांनी प्रमुख भूमिका बजावली. काही सभांमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनीही भाषणे केली. तसेच जिल्ह्यातील पदाधिकाºयांना प्रत्येक प्रभाग वाटून दिला होता. त्यांनी त्या-त्या प्रभागात प्रचाराचा आढावा घेतला. शेवटच्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांची गेंदालाल मिल परिसरात सभा झाली.
काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी फिरविली पाठ
मनपा निवडणुकीत काँग्रेसने प्रचाराचे नियोजन केले असताना प्रदेश व जिल्हास्तरावरचे अनेक नेते मात्र प्रचारापासून लांबच राहिले. जळगाव महानगरच्या पदाधिकाºयांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रचाराची धुरा सांभाळली. काँग्रेसची जळगाव शहरातील स्थिती पाहता माजी मंत्री अब्दुल सत्तार वगळता अन्य नेत्यांनी प्रचाराला येणे टाळले.
प्रचारासाठी प्रदेशचे काही नेते, माजी मंत्री निमंत्रीत करण्यात आले होते. त्यात मालेगावचे आमदार आसिफ शेख व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रचार सभा घेण्याचे नियोजन होते. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवार २७ जून रोजी तांबापुरा, पिंप्राळा, खंडेराव नगर, पिंप्राळा हुडको, सालार नगर, मासुमवाडी, दंगलग्रस्त कॉलनी येथे गृहभेटी व पायी प्रचार केला. त्यानंतर आमदार आसिफ शेख यांनी तांबापुरा व पिंप्राळा हुडको या मुस्लिमबहुल वस्तीमध्ये प्रचार केला.
जिल्हा पदाधिकारी प्रचारापासून दूरच
जळगाव महापालिकेतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी सांभाळली. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनीही उमेदवारांचा प्रचार केला. ग्रामीणच्या पदाधिकाºयांनी मात्र पाठ फिरविली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह बहुसंख्य काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी प्रचारापासून लांब राहणे पसंत केले. जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील हे फक्त उमेदवारांनी शपथ घेतली त्यावेळी व जाहिरनामा