जळगाव मनपा कर्मचा:यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा
By admin | Published: May 20, 2017 06:03 PM2017-05-20T18:03:51+5:302017-05-20T18:03:51+5:30
आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकासह तिघांना निलंबित केले
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 20 - शहरातील शिवाजीनगर भागात सफाईच्या कामात कसूर आढळल्याने मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकासह तिघांना निलंबित केले असून आयुक्तांनी आरोग्य कर्मचा:यांची बाजू ऐकून न घेता कारवाई केली, आरोग्य कर्मचा:यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी आरोग्य कर्मचा:यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. निलंबन रद्द न केल्यास आरोग्य कर्मचा:यांनी सामूहिक रजा व राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.
शुक्रवारी सकाळी शिवाजीनगर भागात मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार व मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी सकाळी केलेल्या पाहणीत या भागात घाणीचे साम्राज्य आढळून आले. त्यानुसार मनपा आयुक्तांनी मनपाच्या तीन कर्मचा:यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाई विरोधात आरोग्य विभागातील अधीक्षक, सहाय्यक निरीक्षक व मुकादमांमध्ये संताप निर्माण झालेला आहे. यामुळे शनिवारी या कर्मचा:यांनी महापौर, उपमहापौर व आयुक्तांना निवेदन देवून ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी प्रामाणिक काम करीत असताना तसेच कुठलाही दोष नसताना निलंबन व दंडाची कारवाई प्रशासनाकडून केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आरोग्य कर्मचा:यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या स्वच्छतेसाठी 970 झाडू कामगार, 2 हजार 106 गटार कामगार व 160 कचरा वाहनांवरील कर्मचारी अशा 3 हजार 236 कामागारांचे आवश्यकता आहे. मात्र शहरात सध्या 925 जणांकडून हे काम करुन घेतले जात आहे. यामुळे शहराची 100 टक्के स्वच्छता करणे अशक्य असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.