Jalgaon: मनपा भरती, मुलाखतीसाठी ३७६ उमेदवार पात्र
By सुनील पाटील | Published: October 30, 2023 07:21 PM2023-10-30T19:21:18+5:302023-10-30T19:21:52+5:30
Jalgaon News: महापालिकेतील ८६ जागांसाठी कंत्राटी पध्दतीने होणाऱ्या भरतीत ३७६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले असून या उमेदवारांच्या १ व २ नोव्हेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे.
- सुनील पाटील
जळगाव - महापालिकेतील ८६ जागांसाठी कंत्राटी पध्दतीने होणाऱ्या भरतीत ३७६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले असून या उमेदवारांच्या १ व २ नोव्हेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेतील विविध पदांवर तात्पुत्या स्वरूपाची करार पध्दतीने ८६ पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यात एकुण ८६ जागांसाठी २ हजार ६४३ अर्ज विविध पदांसाठी प्राप्त झाले होते. त्यापैकी सर्वांधिक अर्ज टायपिस्ट / संगणक चालक पदासाठी तब्बल १०८२ अर्ज प्राप्त झाले होते. २० रोजीनंतर मनपा प्रशासनाकडून अर्ज छाननी सुरु होती. शनिवारी अर्ज छाननी पूर्ण झाली. छाननीत एकुण १८१९ उमेदवार पात्र ठरले असून त्यापैकी ८२४ उमेदवार मुलाखलीला अपात्र ठरले आहेत. तर ३७६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.
१ नोव्हेंबर रोजी कनिष्ठ अभियंता (बांधकाम), कनिष्ठ अभियंता (पा.पु.) ,कनिष्ठ अभियंता विद्युत या पदांच्या सकाळी ११ ते २ दरम्यान मुलाखती होणार आहेत तर आरेखक, विजतंत्री, वायरमन, रचना सहाय्यक यांच्या मुलाखती दुपारी ३ ते ६ दरम्यान होणार आहे. २ रोजी अग्निशमन, फायरमन, आरोग्य निरीक्षक या पदाच्या मुलाखती ११ ते २ या वेळेत होणार असून संगणक चालक या पदाच्या मुलाखती दुपारी ३ ते ६ दरम्यान होणार आहे.