जळगाव, नंदुरबारच्या वनक्षेत्रात वाढ तर धुळे वनक्षेत्र ६ टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:14 PM2020-01-10T12:14:10+5:302020-01-10T12:14:18+5:30

फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियाचा अहवाल : जंगलांमधील वाढत्या अतिक्रमणामुळे धुळ्यात घट ; यावलमध्येही घटले वनक्षेत्र ?

Jalgaon, Nandurbar forest area increased and Dhule forest area decreased by 5% | जळगाव, नंदुरबारच्या वनक्षेत्रात वाढ तर धुळे वनक्षेत्र ६ टक्क्यांनी घटले

जळगाव, नंदुरबारच्या वनक्षेत्रात वाढ तर धुळे वनक्षेत्र ६ टक्क्यांनी घटले

Next

अजय पाटील ।
जळगाव : खान्देशातील जळगाव वनक्षेत्रात २.८४ टक्के व नंदूरबारच्या वनक्षेत्रात ३.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे धुळे वनक्षेत्रात मात्र ६.७३ टक्क्यांची घट झाली आहे. या अहवालान यावल व जळगाव वनक्षेत्राचे एकत्रित मुल्यांकन करण्यात आले आहे. त्यामुळे यावल वनक्षेत्रात वाढलेले शेतीचे अतिक्रमण, प्रचंड वृक्षतोड यामुळे काही प्रमाणात वनक्षेत्र घटले असल्याचेही समोर आले आहे. फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियाने काढलेल्या अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे.
२०१७ ते २०१९ या दोन वर्षातील पाहणीच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये अतिशय घनदाट, मध्यम आणि खुले वनक्षेत्र अशा तिन्ही वर्गवारीतील वनक्षेत्राची पाहणी करण्यात आली. त्यानुनार २०१७ च्या तुलनेत २०१९ डिसेंबरपर्यंत खान्देशात धुळे वगळता नंदूरबार व जळगाव वनक्षेत्रात वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. उपग्रह तंत्रज्ञानाचा आधार घेवून ही हे सर्व्हेक्षण केले आहे.
वाढते अतिक्रमण धोक्याचे
धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आदिवासी उपाययोजना राबविल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमध्ये होतो. धुळे जिल्ह्यात वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड सुरु आहे. शेतीसाठी वनक्षेत्राचा वापर होत असल्याने मूळ जंगलात देखील आता शेती केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे धुळे वनक्षेत्रात घट झाल्याचा अंदाज या अहवालातून समोर आला आहे. धुळ्यातील अनेर अभयारण्य असो व साक्रीचा पश्चिमेकडील भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलाचा ºहास होत असल्याचे समोर आले आहे.

नंदूबारमध्ये घनदाट वनक्षेत्र झाले कमी
अहवालात घनदाट, मध्यम व खुल्या वर्गवारीनुुसार पाहणी करण्यात आली आहे. नंदूरबार वनक्षेत्रात जरी वाढ दिसत असली तरी मात्र घनदाट वनक्षेत्राचे प्रमाण नंदूरबार जिल्ह्यात शुन्य टक्के आहे. हीच स्थिती धुळे जिल्ह्यात देखील पहायला मिळते. जळगाव जिल्ह्यातील यावल व जळगाव वनक्षेत्रात घनदाट जंगल ५१ चौरस किमी इतके आहे.

Web Title: Jalgaon, Nandurbar forest area increased and Dhule forest area decreased by 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.