Jalgaon: रस्त्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे आंदोलन; अधिकारी, नगरसवेकांवर टक्केवारीचा आरोप
By सुनील पाटील | Published: July 24, 2023 03:23 PM2023-07-24T15:23:04+5:302023-07-24T15:23:27+5:30
Jalgaon News: जळगाव शहरातील रस्त, गटार तसेच मुलभूत सुविधांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने सोमवारी मेहरुण रस्त्यावरील वॉर्ड क्रमांक १८ मधील शेरा चौकात आंदोलन केले. यावेळी नगरसवेक १० टक्के कमिशन घेत असून अधिकारीही खिसे गरम करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
- सुनील पाटील
जळगाव - शहरातील रस्त, गटार तसेच मुलभूत सुविधांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने सोमवारी मेहरुण रस्त्यावरील वॉर्ड क्रमांक १८ मधील शेरा चौकात आंदोलन केले. यावेळी नगरसवेक १० टक्के कमिशन घेत असून अधिकारीही खिसे गरम करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. रस्त्याची कामे मार्गी लागली नाहीत तर आयुक्तांच्या दालनाला कुलून ठोकू असा इशाराही यावेळी देण्यात आला. मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीत खोटे आश्वासन देवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरतर्फे आंदोलन करण्यात आले. शहरातील मूलभूत समस्या निकृष्ट दर्जाचे रस्ते तसेच सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी गटारी नाईत ते सांडपाणी हे रस्त्यावरून वाहत असते, त्यामुळे रोगराई पसरुन नागरिकांचा जीव धोक्यात येतो. शडरातील अनेक समस्यांकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. महानगराध्यक्ष अशोक लाडवांजरी, युवकचे जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, महानगराध्यक्ष साहिल पटेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकात निवडणुकीत जळगावचे सिंगापूर करु, असे आश्वासन दिले होते. आज जळगाव कसे आहे हे सांगायला गरज नाही. खोटी आश्वासने देऊन जळगावकरांची फसवणूक केली.
मनपा प्रशासनाविरुध्द घोषणाबाजी
आंदोलन करताना महापालिका प्रशासन, नगरसवेक व मक्तेदार यांच्याविरुध्द घोषणाबाजी करण्यात आली. मनपा प्रशासन हाय हाय, रस्त्याचे रखडलेले काम झालेच पाहिजे, महापालिकेचा धिक्कार असो,१० टक्के कमिशन घेणाऱ्या नगरसेवकांचा धिक्कार असो, मनपा प्रशासन आणि खिसा गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे करायचे काय? अशा घोषणा दिल्या. जेथे रस्ते झाले ते एकाच पावसात वाहून गेले. शासनाकडून ठेकेदार पोसले जात आहेत. शेरा चौकात चार महिन्यापासून खडी टाकून ठेवली आहे. अधिकारी फक्त खुर्च्या गरम करताहेत. नगरसेवक टक्केवारी घेत असल्याने ते फिरकून पाहत नाही. रस्त्याच्या कामात नगरसेवक मक्तेदाराकडून १० टक्के घेऊन खिसे गरम करताहेत. त्यांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे.