जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या छायाचित्रावर फेकली शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:52+5:302021-07-04T04:12:52+5:30

इंधन दरवाढीचा केला विरोध : राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : देशभरात होत असलेल्या इंधन दरवाढीविरोधात ...

In Jalgaon, NCP workers threw ink on the picture of the Prime Minister | जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या छायाचित्रावर फेकली शाई

जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या छायाचित्रावर फेकली शाई

Next

इंधन दरवाढीचा केला विरोध : राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : देशभरात होत असलेल्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दुपारी १२ वाजता शिरसोली रस्त्यावरील पेट्रोल पंपावर आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोलपंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावर शाई फेकून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. या प्रकरणी १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरात महानगर राष्ट्रवादीने महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात शिरसोली रस्त्यावरील पेट्रोलपंपावर आंदोलन केले. यावेळी पेट्रोलपंपावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर शाई फेकून काळे फासले. त्या वेळी पोलिसांनी तातडीने धाव घेत शाई फेकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखले. त्यानंतर लगेच फोटोवरील शाई पुसून टाकण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घरगुती इंधनाच्या दरात वाढ झाल्याच्या निषेधार्थ गॅस सिलिंडरला पुष्पहारदेखील अर्पण केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सदस्यदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात पथनाट्य सादर केले.

राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर केलेल्या आंदोलनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोविड संदर्भात दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केले. तसेच विना परवानगी आंदोलन केले. त्यामुळे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या विरोधात कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यात मनिष जैन, स्वप्नील नेमाडे, योगेश देसले, विकास पाटील, डॉ. रिजवान खाटीक, सैयद इरफान, ॲड. कुणाल पवार, गौरव लवंगणे, जितेंद्र चांगरे, दिलीप माहेश्वरी, अमोल कोल्हे, किशोर सुर्यवंशी, शंभु रोकडे, पंकज बोरोले, नितीन जाधव, रोहित सोनवणे, कल्पना पाटील, उज्ज्वला शिंदे, उज्ज्वला मगर, ममता तडवी, कमल पाटील यासह १५ ते २० इतर कार्यकर्त्यांवर रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: In Jalgaon, NCP workers threw ink on the picture of the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.